#VoteTrendLive जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची विजयाकडे घोडदौड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. जिल्ह्यातील तेरापैकी मुळशी, पुरंदर आणि वेल्हे या तीन पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले असून, मुळशीची सत्ता कायम राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला, तर वेल्हे पंचायत समिती पुन्हा ताब्यात घेण्यात काँग्रेसला यश आले आहे. पुरंदर पंचायत समितीवर शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी कृषी सभापती अरुण चांभारे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दिलीप खैरे आणि माजी सदस्य सुदाम इंगळे यांचा पराभव झाला आहे. 

शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके या सलग चौथ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित राजेंद्र पवार हे बारामती तालुक्‍यातील शिर्सुफळ- गुणवडी या गटातून सर्वाधिक म्हणजेच सुमारे साडेसतरा हजार मताधिक्‍याने विजयी झाले आहेत.  मुळशी पंचायत समितीच्या सहापैकी चार जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने या पंचायत समितीवर निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. उर्वरित दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. वेल्हे पंचायत समितीच्या चारपैकी तीन जागा जिंकत काँग्रेसने पुन्हा एकदा या पंचायत समितीवर विजयी झेंडा फडकावला आहे. अन्य एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. वेल्हे तालुक्‍याचा गड पुन्हा एकदा काँग्रेसने राखला आहे. वेल्हे तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या दोन जागा आहेत. 

आज दुपारी एक वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या ७५ पैकी १७ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी सर्वाधिक आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे दोन, तर भाजप व अपक्ष प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.  

राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांमध्ये हनुमंत बंडगर, प्रवीण माने (दोघेही ता. इंदापूर), रोहित पवार, भरत खैरे (दोघेही ता. बारामती), विवेक वळसे पाटील, अरुणा थोरात (दोघेही ता. आंबेगाव), शंकर मांडेकर, अंजली कांबळे (दोघेही ता. मुळशी) यांचा, तर शिवसेनेच्या आशा बुचके (जुन्नर), तनुजा घनवट (ता. खेड), सागर काटकर (पौड- कासारअंबोली), शलाका कोंडे (ता. भोर) व दिलीप यादव (पुरंदर), काँग्रेसचे दिनकर धरपाळे व अमोल नलावडे (दोन्हीही ता. वेल्हे), भाजपचे अतुल देशमुख (ता. खेड) व अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले (ता. आंबेगाव) आदींचा समावेश आहे. पुरंदरमधील जिल्हा परिषदेच्या चारपैकी तीन जागा शिवसेनेने, तर एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. 
 
पती जिंकला, पत्नी हरली 
भाजपने खेड तालुक्‍यातील सातपैकी दोन जागांवर अतुल देशमुख आणि त्यांच्या पत्नी कल्पना देशमुख यांना उमेदवारी दिली होती. या दांपत्यापैकी पती अतुल देशमुख जिंकले असून, पत्नी कल्पना पराभूत झाल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी हे एकमेव दांपत्य निवडणूक रिंगणात उतरले होते.

Web Title: #VoteTrendLive ncp to win zp