Vidhan Sabha 2019 : दौंडमध्ये तिन्ही उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : राहू (ता. दौंड) येथे भाजपचे उमेदवार राहुल कुल व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामदैवत शंभू महादेवाचे दर्शन घेऊन सकाळी मतदानाचा हक्क बजावला. खुटबाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. तर वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार तात्यासाहेब ताम्हाणे यांनी भरतगाव येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले. मतदानानंतर सर्व उमेदवारांनी विजयाचा दावा केला.

राहू (पुणे) : राहू (ता. दौंड) येथे भाजपचे उमेदवार राहुल कुल व त्यांच्या कुटुंबीयांनी ग्रामदैवत शंभू महादेवाचे दर्शन घेऊन सकाळी मतदानाचा हक्क बजावला. खुटबाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. तर वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार तात्यासाहेब ताम्हाणे यांनी भरतगाव येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदान केले. मतदानानंतर सर्व उमेदवारांनी विजयाचा दावा केला.

राहू परिसर आणि खुटबाव मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र, ढगाळ वातावरण दिसत होते. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण आणि तरुणींमध्ये उत्साह जाणवत होता. दुपारच्या पुढे हवामान खात्याने पावसाचा अंदाज दर्शविल्यामुळे दुपारपर्यंत जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती.

गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची पावती मतदार नक्कीच देईल. दौंड तालुक्‍याचा केलेला सर्वांगीण विकास, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिवावर मोठ्या मताधिक्‍क्‍याने मी नक्कीच विजयी होईल.
- राहुल कुल, उमेदवार, महायुती, दौंड

दौंड तालुक्‍याचा विकास नव्हे तर तालुका भकास झाला आहे. 2009 ते 2014 या कालावधीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. विकासकामे करण्यासाठी दौंडची जनता मला विधानसभेत नक्कीच पाठवतील.
- रमेश थोरात, उमेदवार, महाआघाडी, दौंड

दौंड तालुक्‍याचा तिसरा पर्याय म्हणून सामान्य जनता माझ्याकडे पाहते. प्रचार दौऱ्यामध्ये दौंड तालुक्‍यातील जनतेने माझे उत्स्फूर्तपणे गावोगावी स्वागत केले. तिसरा सक्षम उमेदवार म्हणून दौंड जनता माझ्याकडे पाहत असून, या निवडणुकीत दौंडची जनता नक्कीच परिवर्तन करेल.
- तात्यासाहेब ताम्हाणे, उमेदवार, वंचित बहुजन विकास आघाडी, दौंड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voting by all three candidates from daund Constituency in Vidhan Sabha Election 2019