‘एक दिवस मतदानासाठी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भाजपच्या वतीने ‘एक दिवस मतदानासाठी’ हे मतदार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख, सुशासनासाठी हे अभियान येत्या बुधवारी (ता. २५) शहरभर राबविण्यात येणार आहे, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

अभियानाची तयारी करण्यासाठी प्रभागांच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांची आणि सहायकांची बैठक घेण्यात आली होती. यात गोगावले यांनी मार्गदर्शन केले. मतदार यादीचे सर्वेक्षण करण्यासाठी पक्षाने विकसित केलेले ‘मिशन २०१७’ हे सॉफ्टवेअर रविवारपासून इच्छुकांना उपलब्ध करून दिले आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सात वाजता एकाच वेळी प्रभागातील हजारी यादीप्रमुखांच्या प्रभागात बैठका होणार असून, बुधवारी (ता. २५ जानेवारी) मतदान जागृती दिनाचे औचित्य साधून भाजपचे कार्यकर्ते सकाळी साडेसातपासून रात्री दहा वाजेपर्यंत प्रभागातील घराघरांत जाऊन जनजागृती करणार आहेत.

Web Title: Voting for a day