जिल्ह्यातील मतदान यंत्रे पोचली भोसरीत

भोसरी - वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सुरू असलेली तयारी.
भोसरी - वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सुरू असलेली तयारी.

पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्रे (ईव्हीएम) भोसरीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक विभागाचे यंत्रांची तपासणी (फिजिकल इन्स्पेक्‍शन) सुरू आहे. तसेच विधानसभा मतदारसंघांनुसार मतदानयंत्रांचे वितरण करण्यासाठी व निवडणूक विषयक अन्य कामे करण्यासाठी गोदामाच्या परिसरात मंडप उभारणीचे कामही सुरू आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर, कोथरूड, कॅंटोन्मेंट, पर्वती, कसबा पेठ, वडगाव शेरी; बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, भोर-वेल्हे, खडकवासला; शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर, खेड-आळंदी, भोसरी, आंबेगाव, जुन्नर, हडपसर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड व मावळ या विधानसभा मतदारसंघांनुसार वितरित केली जाणारी मतदान यंत्रे वखार महामंडळाच्या भोसरीतील गोदामात ठेवली आहेत. या पूर्वी अन्नधान्य वितरण विभागाच्या शिवाजीनगर येथील गोदामात मतदानयंत्रे ठेवली जात होती. परंतु, शिवाजीनगरची गोदामे महामेट्रोसाठी दिल्याने मतदानयंत्रे ठेवण्यासाठी निवडणूक विभागाला वखार महामंडळांच्या गोदामांचा वापर करावा लागत आहे. मतदानापूर्वी विधानसभा मतदारसंघानिहाय मतदानयंत्रे पाठविली जाणार आहेत. त्याची कामे करण्यासाठी आवारात मंडप उभारणीचे काम गुरुवारी (ता. १४) सुरू होते.

मतदान यंत्रे चांगल्या व चालू स्थितीत आहेत की नाहीत, त्याची तपासणी केली जाणार आहे. मतदारसंघ व मतदान केंद्रांनुसार मतदानयंत्रे पाठविण्यासाठी त्यांची निवड किंवा अनियतीकरण करण केले जात आहे.

तसेच, सुरक्षा साधने, व्हिडिओ चित्रीकरण कॅमेऱ्यांची तपासणीही केली जाणार आहे. तसेच, उमेदवारांची यादी असलेले यंत्र (बीयू अर्थात बॅलेट युनिट), मतदार केंद्रप्रमुखाकडील नियंत्रण यंत्र (सीयू अर्थात कंट्रोल युनिट) आणि मतदार सत्यता पडताळणी यंत्र (व्हीव्हीपॅट अर्थात वोटर व्हेरियबल पेपर ऑडिट ट्रायल) यांचीही तपासणी केली जात आहे. 

व्हीव्हीपॅट मशिन प्रथमच
ईव्हीएम, बीयू, सीयू व व्हीव्हीपॅट ही यंत्रे चालू व सुस्थितीत आहेत की नाही, याची तपासणी सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर रॅंडोमायझेशन करून जिल्ह्यातील पुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघांतील सर्व विधानसभा मतदारसंघ आणि मावळातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानयंत्र पाठविण्यात येणार आहेत. व्हीव्हीपॅट यंत्र पहिल्यांदाच वापरण्यात येणार आहे, असे निवडणूक विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com