सलाम "या' कर्मचाऱ्यांना

Matadan
Matadan

भोर (पुणे) : भोर तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील रायरेश्‍वर, धानवली, रायरी-धारांबे वस्ती व भूतोंडे खोऱ्यातील मळे-महादेववाडी या मतदान केंद्रांवर जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना भर पावसात आणि दाट धुक्‍यात कित्येक किलोमीटर डोक्‍यावर साहित्य घेऊन चालत जावे लागले.

मतदारसंघात मोबाईलची रेंज नसलेल्या 69 मतदान केंद्रांवर वायरलेस यंत्रणा उभारली असून 34 रनर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावरील सद्यःस्थितीची माहिती मिळणार आहे. याशिवाय मतदारसंघातील 6 हजार 200 दिव्यांग मतदारांसाठी योग्य त्या सोयी-सुविधांची सोय करण्यात आली आहे.

भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली असून सर्वच्या सर्व 529 मतदान केंद्रांवर कर्मचारी पोचल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली. तीनही तालुक्‍यांतील मतदान केंद्रांवर 3 हजार 452 कर्मचारी निवडणुकीच्या साहित्यासह हजर झाले आहेत. याशिवाय 204 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यातील तहसील कार्यालयात कंट्रोल रूम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना मतदानाविषयी असलेल्या तक्रारी तेथे स्वीकारल्या जाणार आहेत. याशिवाय 1950 या टोल फ्री क्रमांकावरही नागरिक आपल्या तक्रारी दाखल करू शकतात, असेही राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com