मतदान करणाऱ्यांना एकावर एक मिसळ फ्री

Misal-Pav
Misal-Pav

पुणे - नागरिकांनी मतदान करावे म्हणून शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि काही संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मयूर कॉलनीमधील एका हॉटेलमध्ये मतदान करणाऱ्यांना एका मिसळवर एक मिसळ मोफत दिली जाणार आहे.

बिबवेवाडी येथील एका हॉटेलात काही खाद्यपदार्थांवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. मतदान केल्याची शाई दाखविल्यास मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 

मयूर कॉलनीमधील जोग शाळेजवळील कडक मिसळमध्ये एकावर एक मिसळ फ्री अशी ऑफर मतदारांना देण्यात येणार आहे. 

बिबवेवाडीमधील दामोदर पी ३० या हॉटेलमध्ये उपीठ आणि पोहे खाणाऱ्यांना ५० टक्के सवलत देणार आहे, अशी माहिती हॉटेलचालक आलोक ठकार यांनी दिली. आरोग्याची काळजी असणाऱ्यांनादेखील मतदान करणे फायद्याचे ठरणार आहे. गोखलेनगरमधील आकांक्षा फाउंडेशन मतदारांची मोफत आरोग्य तपासणी करून देणार आहे. गोखलेनगरमधील वैष्णवी डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत तपासणी करता येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या डॉ. अपर्णा गोसावी आणि डॉ. आकांक्षा गोसावी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com