मतदान जागृतीमुळे वाढणार मतदानाचा टक्का - रामनिवास झंवर

pune
pune

इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त मतदारांनी घेतला. त्यामध्ये इंदापूर महा-विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वपुर्ण होता. परीक्षेस जाण्यापुर्वी महाविद्यालयीन युवकांनी फलकावर स्वाक्ष-या करून आपला उस्फुर्त सहभाग नोंदविला.  

तहसिलदार सोनाली मेटकरी, पोलीस निरीक्षक मधुकर पवार, पुणे सहसंचालक कार्यालय प्रशासनअधिकारी प्रकाश बच्छाव, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर, आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक डॉ. संदेश शहा, सचिव जमीर शेख यांच्या हस्ते फलकावर स्वाक्षरी करून या अभियानाची सुरूवात झाली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी या वस्तुनिष्ठ उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, भारतीय लोकशाही जगप्रसिध्द असून जगातील इतर लोकशाही असणा-या देशांना ती मार्गदर्शक व दिशादर्शक आहे. संविधानकर्त्यांनी नागरिकांचे लोकशाहीतील हक्क व कर्तव्य अतिशय मेहनतीने तयार केले आहेत. त्यामुळे देशाच्या व आपल्या उज्वल भवितव्यासाठी प्रत्येकाने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे ही काळाची गरज आहे.

नगरपरिषद मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले, दान या शब्दाचा अर्थ मोठा आहे. रक्तदान, अन्नदान, ग्रंथदान, अवयवदानाप्रमाणे मतदान देखील तेवढेच महत्वाचे आहे. कारण मतदानाव्दारे आपण आपल्या मताचा हक्क बजवून आपल्या प्रतिनिधीकडे देशाचे भवितव्य सोपवत असतो. नागरिकांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी लोकशाही पध्दतीने आपण आपले प्रतिनिधी निवडत असल्याने प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे.

यावेळी महाविद्यालयीन सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. उत्तम माने, प्रा. भरत भुजबळ, प्रा. शिवाजी वीर, प्रा. गजानन मेश्राम, प्रा. अशोक पाटील, प्रा. कल्पना भोसले, प्रा. रविंद्र साबळे, प्रा. युवराज फाळके, प्रा. तानाजी कसबे, प्रा. गौतम यादव, अशोक चिंचकर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com