पारवडीच्या गावडे विद्यालयाची वृक्षदिंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

महाराष्ट्र शासन 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाच्या माध्यमातून बारामती सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढली.

शिर्सुफळ - 'झाडे लावा, झाडे जगवा', 'कावळा करतो काव काव', 'माणसा माणसा झाड लाव' यांसारख्या घोषणा देत पारवडी (ता. बारामती) येथील कै जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढीत वृक्षारोपण व वृक्षसंर्वधनाचा संदेश दिला.
       
महाराष्ट्र शासन 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाच्या माध्यमातून बारामती सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढली.  यावेळी मुलींनी ग्रामीण भागातील महिलांची केलेली वेशभूषा आकर्षण ठरली. यावेळी बोलताना प्राचार्य सखाराम गावडे यांनी पर्यावरणात झाडाचे महत्व सांगितले.
     
यावेळी बारामतीचे सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्यासह गावचे सरपंच जिजाबा गावडे, बाळासो दिवाने, यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगिता गावडे, तानाजी गावडे, उपसरपंच अनिल आटोळे व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला रोप भेट..
यावेळी बोलताना वनक्षेत्रपाल अजित शिंदे म्हणाले, या उपक्रमांर्तगत 31 जुलै पर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्यांना त्या दिवशी शाळेतच भेट म्हणुन एक रोप भेट देण्यात येईल. त्या रोपाचे योग्य संगोपन करुन दरवर्षी त्याचा सेल्फी पाठवित आगळा वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन जाहिर केले व लगेच आज ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांना रोप भेट देण्यात आले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: vrukshadindi of gavde vidyalaya parvadi