चला धावूया पर्यावरणासाठी..!

सारसबाग - ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेले धावपटू.
सारसबाग - ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी झालेले धावपटू.

सहकारनगर - पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी (९ जून) ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन : २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकाळ’ आणि ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे ही स्पर्धा होणार आहे. ‘वृक्षाथॉन’बाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी शहरातून रविवारी सकाळी रॅली काढण्यात आली. या वेळी पर्यावरण संवर्धनाबाबत प्रबोधन करीत मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले.

सारसबाग, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या मार्गे ही रॅली परत सारसबागेत आली. ‘चला धावू या पर्यावरणासाठी’ असा संदेश या रॅलीत सहभागी झालेल्या तीनशे धावपटूंनी या वेळी दिला. धावपटू व उद्योजक शिवानंद गोखले म्हणाले, ‘‘झाडे आपल्याला ऑक्‍सिजन पुरवतात, त्यामुळे वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धन करण्यासाठी धावपटू चांगल्या प्रकारे नागरिकांमध्ये जनजागृती करू शकतात. यासाठी जागतिक पर्यावरणदिनी आयोजित केलेल्या ‘वृक्षाथॉन : २०१९’मध्ये शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे.’’ 

प्रसाद पाटील यांनी या वेळी धावपटूंना मार्गदर्शन केले. ‘फिटनेस फर्स्ट’चे संचालक विजय गायकवाड यांनी असामान्य हवामान बदल नियंत्रित करण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट केले. स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम, दीपक जगताप, सुधीर दारोडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. संतोष मोरे, महादेव निर्मल, रोहित साळवे व अजिंक्‍य जगताप यांनी या रॅलीचे नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com