उद्याची पहाट वृक्षाथॉनची  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

पुणे - चला, पर्यावरणासाठी धावूया...उद्याच्या सावलीसाठी आज रोपटे लावूया... वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे रविवारी (ता. १०) ‘वृक्षाथॉन’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. 

पुणे - चला, पर्यावरणासाठी धावूया...उद्याच्या सावलीसाठी आज रोपटे लावूया... वृक्ष लागवड आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ आणि ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे रविवारी (ता. १०) ‘वृक्षाथॉन’ ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने होणाऱ्या या स्पर्धेचे उद्‌घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीव्हीआयपी सुरक्षा) कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी) संजयकुमार आणि पुणे ग्रामीण पोलिस उप अधीक्षक तेजस्वी सातपुरे यांच्या हस्ते होणार आहे. हे चौघेजण स्पर्धेत धावणारही आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजावा आणि वृक्ष लागवडीसाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे येऊन हातभार लावावा, या उद्देशाने ही स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा ३, ५, १० आणि २१ किलोमीटर अंतराची असून, ४० वर्षांखालील आणि ४० वर्षांपुढील पुरुष-महिला अशा गटात होईल. प्रत्येक सहभागीला देशी जातीच्या वृक्षाचे रोप आणि पदक दिले जाईल. पुणे जिल्हा ॲथलेटिक्‍स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होईल. पहाटे साडेपाच वाजता श्री महावीर जैन विद्यालय (बीएमसीसी रस्ता) येथून स्पर्धेला सुरवात होईल. या स्पर्धेत नागरिकांनी स्पर्धेत धावणाऱ्या स्पर्धकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

अधिकाऱ्यांचा सहभाग
‘वृक्षाथॉन’ स्पर्धेत विविध विभागांतील अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सहभागी प्रत्येक धावपटूला ‘सीड्‌स बॉल्स’ दिले जातील. स्पर्धेच्या मार्गावरील मोकळ्या जागेत हे बॉल्स ते टाकतील.

Web Title: Vrukshathon pune news environment