VSI'ची व्याप्ती जागतिक स्तरावर वाढावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Vidarbha great contribution to the democratic movement said Sharad Pawar
Vidarbha great contribution to the democratic movement said Sharad Pawar

पुणे: शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) राज्यातच नव्हे तर, देश पातळीवर केंद्रे सुरू व्हावीत. या संस्थेचे कार्य जागतिक स्तरावर पोचावे. त्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मांजरी (जि. पुणे) येथील "व्हीएसआय'च्या शनिवारी आयोजित 44 व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा "व्हीएसआय'चे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, "व्हीएसआय'चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, साखर आयुक्‍त शेखर गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या वतीन कारखान्यांना जाहीर केलेले पुरस्कार स्वतंत्ररित्या वितरीत करण्यात येतील, असे या वेळी सांगण्यात आले. 

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु

ठाकरे म्हणाले, "शेतीला विज्ञानाची जोड देणे आवश्‍यक आहे, त्या दृष्टीने "व्हीएसआय' काम करीत आहे. राज्य सरकारकडून संस्थेच्या केंद्रासाठी मराठवाड्यात जागा उपलब्ध करून दिली, याबाबत समाधान आहे. या प्रयोगशील संस्थेची व्याप्ती वाढावी, तसेच, कृषी, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रात कशी प्रगती साधता येईल, यादृष्टीने "व्हीएसआय'ने प्रयत्न व्हावेत. 

लॉकडाऊनमुळे गतवर्षी ऊसतोडणी कामगारांना घरी परतण्यासाठी त्रास झाला. परंतु साखर कारखान्यांनी त्यांना घरी पोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत आरोग्याची काळजी घेतली. या सहकारामुळे राज्यात कोरोना पसरला नाही, अशी प्रशंसा त्यांनी केली. 

सीरमनंतर स्वदेशी भारत बायोटेकच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता; बैठक सुरु

महाआघाडी "सहकारा'ला लाभदायक 
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार साखर उद्योगासह सहकार क्षेत्राला निश्‍चितच लाभदायक ठरेल. साखर उद्योग क्षेत्राबद्दल माझ्याकडे माहिती परंतु आपल्याकडे ज्ञान आहे. त्याचा उपयोग करून योग्य दिशेने पावले टाकावीत. राज्य सरकारकडून साखर उद्योगासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. 

कृषी कायद्यावर टीकास्त्र 
"विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. गोसीखुर्द प्रकल्पामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळेल, पूर्व विदर्भाचा पंजाब होईल, असे तेथील शेतकरी सांगत होते. परंतु सध्या पंजाबचे शेतकरी रस्त्यावर आले आहेत. बऱ्याच कष्टातून शेतकरी उभा राहतो. परंतु अचानक कायद्याचा हातोडा मारल्यास सर्वकाही विखुरले जाते,' अशा शब्दांत ठाकरे यांनी केंद्राच्या कृषी कायद्याबाबत टीका केली. 

ICC ने दिला पार्थिव पटेलच्या विश्वविक्रमी आठवणीला उजाळा

शरद पवार दूरदृष्टी असलेले नेते : मुख्यमंत्री 
"देशात सध्या दृष्टी असलेली माणसे विरळ झाली आहेत. दूरदृष्टी तर लांबच. परंतु राज्याला आणि देशाला शरद पवार यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. पवार यांच्या अनुभवाचा लाभ न घेतल्यास आपण खुजे राहू,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com