Vidhan Sabha 2019 : भोसरीत ७ मतदान केंद्रात व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड; यंत्रे बदलून मतदान पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील ७ मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रात सकाळी बिघाड झाला. त्यामुळे, तेथील व्हीव्हीपॅट यंत्रे बदलून मतदान सुरू करण्यात आले. 

Vidhan Sabha 2019 : पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील ७ मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रात सकाळी बिघाड झाला. त्यामुळे, तेथील व्हीव्हीपॅट यंत्रे बदलून मतदान सुरू करण्यात आले. 

भोसरी परिसरात सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत एकूण २२ हजार ५२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये, पुरुष मतदारांची १५ हजार २१८ तर महिला मतदारांची ७ हजार ३१० इतकी संख्या राहिली. 

पीसीएमसी शाळा क्रमांक २२ चर्होली, सु.ना.बारसे माध्यमिक विद्यालय, दिघी रोड, प्राथमिक विद्यालय, आदर्श नगर दिघी, मनपा शाळा क्रमांक ९२ म्हेत्रे वस्ती, मनपा मुलींची शाळा क्रमांक ८९ कुदळवाडी, मनपा शाळा क्रमांक ९८ तळवडे गावठाण, सिद्धेश्वर हायस्कूल, इमारत क्रमांक १,दिघी रोड येथील व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे, तेथील यंत्रे बदलण्यात आली.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VVPAT breaks down at 4 polling booth at Bhosari Vidhan Sabha 2019