पुणे : रविवार पेठेतील वाडा पडला; जीवितहानी नाही (व्हिडिओ)

pune.jpg
pune.jpg

पुणे : माती, विटांच्या भिंती व लाकडाचा ढाचा असलेला रविवार पेठेतील दुमजली जुना वाडा मंगळवारी सकाळी दहा वाजता कोसळला. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच वाड्यातील रहिवासी अन्यत्र राहण्यास गेल्याने मोठी दुर्घटना टळली



रविवार पेठेतील भांडी आळीमध्ये दुमजली जुना वाडा आहे. तो मोडकळीस आल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने वाड्यातील रहिवाशांना वाडा खाली करण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजता हा वाडा कोसळला. यामध्ये काही जण अडकले असल्याची खबर अग्निशमन दलास मिळाली. त्यानुसार अग्निशमन दलाची गाडी, बचाव पथक, देवदूत गाडी घटनास्थळी तत्काळ दाखल झाली. परंतु, वाड्यामध्ये कोणीही राहत नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

दरम्यान, एका कुटुंबातील काही जण कधीतरी वाड्यामध्ये येऊन राहत होते. मात्र, घटनेच्या वेळी ते कुटुंब तेथे नव्हते, अशी परिसरातील रहिवाशांनी माहिती दिल्याचे अग्निशमन विभागातर्फे सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे अधिकारी समीर शेख, प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com