वडगाव बुद्रुक येथे व्यावसायिकाकडुन वृक्षतोड; पालिकेचे दुर्लक्ष

निसर्गप्रेमी तसेच स्थानिक नागरिक व पर्यावरण संघटना आक्रमक
vadgaon
vadgaonsakal

धायरी : वडगाव बुद्रुक (Wadgaon Budruk) येथील पाउजाई मंदिर परिसरात असणाऱ्या नवले पुलाकडून वडगावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर 20 वर्षे जुनी असणारी दोन झाडे तोडण्याचा प्रयत्न एका बांधकाम व्यावसायिकाकडून सुरू आहे. पालिका प्रशासनातील अधिकारी (pune Municipal officer) मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन व्यावसायिकाच्या बेकायदेशीर कामाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. (Wadgaon Budruk area businessman cutting trees pune Municipal negligence)

व्यावसायिकाने इमारतीच्या दर्शनीय बाजू समोरील एक झाड तोडले आहे तर दुसऱ्या झाडाच्या खोडाजवळील माती काढून मुळे सैल केली आहेत. झाड पडावे हा व्यावसायिकाचा उद्देश स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र अधिकारी संबंधीत व्यावसायिकावर कारवाई करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या वृक्षतोडीबाबत काही नागरिकांनी आवाज उठवला आहे. झाडे खुप जुनी असल्याने ती तोडू नयेत अशी मागणी नागरिक करत आहेत. संबंधित व्यावसायिक हा स्थानिक नगरसेवकाचा जवळचा नातेवाईक असल्यामुळे पालिका प्रशासन कारवाई करत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

vadgaon
माळेगावच्या गोळीबार प्रकरणात माजी सरपंचांना जामीन मंजूर

'संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. ते झाड रस्त्यावर आले म्हणून मनपाने त्या झाडाच्या फांद्या देखील छाटणी केली आहे. तसेच संबंधित ठिकाणी वरिष्ठांसोबत पुन्हा पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल,' अशी माहिती सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यलयाचे वृक्ष निरीक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.

vadgaon
गारवा हॉटेल मालक खून प्रकरण; आरोपीच्या पत्नीला या कारणामुळे अटक

माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट बोलताना म्हणाले, 'वडगाव बुद्रुक शेळके नगर पाऊजाई माता मंदिर रोड जवळील वडाचे झाड वीस वर्षे जुने आसून केवळ एका बाधकामासाठी हे झाड पडण्याचा डाव आहे . संबधीत वडाचे झाड सदर बांधकाम व्यावसायिकाने अर्धे तोडलेले आहे. महापालिका जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे दुर्मिळ वृक्ष नष्ट होत आहे.रस्त्याच्या कडेला असणारी झाडेच आता माणसाचा आधार आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com