वडगाव- धायरी परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हाॅटस्पाॅट 

विठ्ठल तांबे
Sunday, 13 September 2020

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव, धायरी या परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे.
धायरीमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचं लक्षात येताच पालिकेकडून ज्या भागात साठ पेक्षा जास्त रुग्ण आहे अश्या परिसरात महत्त्वाचे रस्ते पत्रे घालून बंद करण्यात आले. पण नागरिकांनी तिथूनही बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधल्याचं चित्र आहे.

धायरी (पुणे) : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव, धायरी या परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे.
धायरीमध्ये कोरोनाचा धोका वाढत असल्याचं लक्षात येताच पालिकेकडून ज्या भागात साठ पेक्षा जास्त रुग्ण आहे अश्या परिसरात महत्त्वाचे रस्ते पत्रे घालून बंद करण्यात आले. पण नागरिकांनी तिथूनही बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधल्याचं चित्र आहे. त्यामुळे अशाने कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या शहरात दररोज साडेसहा हजारपर्यंत नागरिकांच्या चाचण्या होत आहेत. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु असं असलं तरी रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना हाताबाहेर जातो की काय अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या काही दिवसांत पुण्यात आकडा वाढतो आहे. हा आकडा कमी न झाल्यास चार ते आठ दिवसांत पुण्यात स्थिती बिघडू शकते अशी भीती महापालिककेने व्यक्त केली आहे. अत्यवस्थ रुग्ण संख्या कमी होत नसल्याने आयसीयू ,ऑक्सिजन बेड्सची गरज सातत्याने वाढत आहे. अशात व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता तर आधी पासूनच आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. 

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

एकट्या धायरी गावात रविवारपर्यंत (ता. १३) तब्बल ५९४अक्टिव्ह रुग्ण आहेत. वडगावात २९८ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलापासून धायरी पर्यंत एकूण १५३४ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याचे माहितीतून समोर आले आहे. तसेच आतपर्यंत वडगाव धायरी मध्ये आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाल्याचे सामोर आले असून.एकूण कोरोना बाधित २९३३, तर बरे झालेले २०६१ रुग्ण आहे. त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता वार्ड ऑफिस अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक-३३, ३४, ३०, ४२ एकूण रुग्णांची संख्या- ८१५६, एकूण बरे झालेले रुग्ण-६४६०, एकूण अॅक्टिव्ह रुग्ण-१५३४, एकूण मृत्यू-१९६ इतके आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wadgaon- Dhayari area is becoming the new hotspot of Corona