वडगाव निंबाळकर - जिल्हा स्तरिय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल

baramati
baramati

वडगाव निंबाळकर - कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतिने वसंतराव पवार यांचे पुण्यस्मृती निमित्त रविवार दि. २ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात वैभवी तावरे (सांगवी) मध्यम गटातून सिद्धी बडे (कटफळ) मोठ्या गटातून प्रिती ठोंबरे (करंजे) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विविध शाळांमधिल १५८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. लहान गटातील दहा मोठ्या मध्यम गटातून पहिल्या सात स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह देउन गौरवण्यात आले. 

बक्षिस वितरण समारंभासाठी बारामती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी अध्यक्ष नितिन शेंडे वाचनालयाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिष खोमणे, पोलिस पाटील शरद खोमणे, तालुका ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष चिंतामणी क्षीरसागर, सांगवीच्या सरपंच वर्षा तावरे, नंदकुमार मोरे, वाचनालयाचे सचिव रघुनाथ शिर्के ग्रंथपाल अनिल चव्हाण रामचंद्र पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक दत्तात्रेय भोसले यांनी सुत्रसंचालन शैलजा साळवे आभार प्रकाश टेकाळे यांनी मानले महादेव लांडगे, जयराम ठाकरे, बाबसो जगताप, विठ्ठल निकाळजे, सुखदेव कोल्हे, ए आर धायगुडे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

तीन गटातील वयक्तिक निकाल अनुक्रमे पुढील प्रमाणेः 
छोटा गट (१ली ते ४ थी) दुसरा क्रमांकः वेदांत हेमंत बारवकर प्राथमिक विद्या मंदीर पणदरे अवंतीका नामदेव वाबळे विद्या प्रतिष्ठाण बारामती, संस्कृती संजय जगताप प्राथमिक विद्या मंदीर पणदरे, वैष्णव संतोष जांबले विद्या प्रतिष्ठाण बारामती, तनिष्का गणेश जाधव रेसिडन्सी इंटर स्कुल लाखेवाडी, सोहम संजय भांगीरे विद्या प्रतिष्ठाण बारामती, सुमेधा जनार्दन चौधरी विठ्ठल इग्लीश मेडीयम स्कुल भिकोबानगर, तन्वी प्रशांत साळुंके भिकोबानगर, मनिष सतिष हाके प्राथमिक विद्या मंदीर पणदरे

मध्यम गट (५ वी ते ७ वी) दुसराः अंकीता अंकुश मोरे विद्या प्रतिष्ठाण बारामती, श्रेयश आबा गोरडे विद्याधाम प्रशाला शिरूर, श्रेणीक संतोष जांभले विद्या प्रतिष्ठाण बारामती, शरयु विवेक मुळे प्रेसिडेन्सी इंटर नॅशनल स्कुल लाखेवाडी, मयुर धनाजी कारंडे विद्या निकेतन स्कुल लाखेवाडी, सिद्धेश सतिष सुतार स्वातंत्र विद्या मंदीर वडगाव निंबाळकर

मोठा गट (८ वी ते १० वी) दुसराः दिप्ती शहाजी भराडे विद्या प्रतिष्ठाण बारामती, प्रेरना प्रशांत धापटे सिद्धेश्र्वर हायस्कुल कोऱ्हाळे बुद्रुक, सृष्टी संतोश शेंडकर सोमेश्र्वर हायस्कुल सोमेश्र्वरनगर, उत्कर्षा अनिल गंगारे एम एस हायस्कुल बारामती, धृव हेमंत बारवकर नवमाहाराष्ट्र विद्यालय पणदरे, स्वराज अनिल ढवरे विद्या प्रतिष्ठाण बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com