‘आयटी पार्कमध्ये स्थानिकांना नोकऱ्या देऊ’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी -  आयटी पार्कमुळे खराडी जगाच्या नकाशावर पोचले आहे. आयटी पार्क खराडीत असला, तरी त्यात चंदननगर-खराडीतल्या तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी नाहीत. शिवसेना हे चित्र बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्थानिक तरुणांना नोकऱ्या देण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे, असे सांगत शिवसेनेच्या प्रभाग चारमधील उमेदवारांनी तरुणांशी संवाद साधला. 

प्रभाग चार खराडी-चंदननगरमधील शिवसेनेचे उमेदवार संतोष दादाभाऊ भरणे, संध्या धनाजी पठारे, मीनाक्षी सुरेश शेजवळ आणि सुनील साधू थोरात आदींनी चौधरी वस्ती परिसरात पदयात्रा काढून नागरिक, तरुणांशी संवाद साधला. 

या वेळी गोकूळ गवळी, शाम थोरात, सादिक शेख, संतोष कोळी, सतीश ढोले, कैलास गव्हाने, कोलते साहेब, सचिन भालेकर, सिद्धेश्वर साळुंखे, नंदकुमार धुमाळ, राज बारगुडे, राहुल गायकवाड, धीरजशेठ पठारे, संग्राम पठारे, सुनीत वाकडे आदी उपस्थित होते. भरणे म्हणाले, ‘‘सगळी कंत्राट एकाच घरात वाटून घेणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देऊन सर्वसामान्यांच्या घरात रोजगाराची गंगा पोचवण्यासाठी बदल घडवा. स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी शिवसेना जिवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही.’’ संध्या पठारे म्हणाल्या, ‘‘शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, दौंड, लातूर, सोलापुर या दुष्काळी भागांतील अनेक कुटुंबे पोटासाठी खराडी-चंदननगरमध्ये येऊन राहिली आहेत. या वर्गाच्या समस्यांकडे कोणत्याच राजकीय पक्षाने लक्ष दिलेले नाही. काही स्थानिक पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी या वर्गाला कायमच निवडणुकीपुरते वापरून घेतले.’’ 

सुनील थोरात व सुरेश शेजवळ म्हणाले, ‘‘स्थानिक, अल्पशिक्षित, उच्चशिक्षित महिला, तरुणी व तरुणांना खराडी परिसरातच रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारत आहे.’’

Web Title: wadgaon sheri prabhag