वाघोली कचरा प्रकल्पासाठी दोन एकर गायरान

Garbage
Garbage

वाघोली - वाघोलीतील कचरा प्रकल्पासाठी दोन एकर गायरान जागा देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वाघोलीच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी दिली.

वाघोली येथील विविध प्रश्‍नांसंदर्भात आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली वाघोलीतील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी वाघोलीतील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आयटीआयसाठी देण्यात आलेली वाघेश्‍वर उद्यानाची जागा वगळून इतर मोकळी जागा द्यावी, वाघेश्‍वर उद्यानाच्या जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करावी, पोलिस ठाण्यासाठी केसनंद फाटा येथील २० गुंठे जागा द्यावी, अशी मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. तसेच वाघोली येथील गायरान क्षेत्राचे प्रमाण जास्त असल्याने तातडीने पीएमआरडीएने काही जागांवर आरक्षणे टाकावीत, याबाबत पीएमारडीएच्या आयुक्तांना कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, तहसीलदार हिरामणी, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच संदीप सातव, रामदास दाभाडे, माजी उपसरपंच समीर भाडळे, ग्रामपंचायत सदस्य मारुती गाडे, जयप्रकाश सातव, महेंद्र भाडळे, किसन महाराज जाधव, हरी पाचारणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com