बनावट मतदारांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

वाघोली - शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेल्या वाघोलीतील ३४०० बनावट मतदारप्रकरणी तत्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी पर्यवेक्षक चंद्रकांत दळवी यांच्याकडे केली आहे. दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास सोमवार (ता. ६) पासून उपोषणाचा इशाराही त्यांनी पत्राद्वारे दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत शिरूर व हवेली तहसील कार्यालयाकडून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. 

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत वाघोलीतील नवीन मतदारांची ३४०० नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले आहे. हे अर्ज वाघोली तलाठी कार्यालयाकडून शिरूर तहसील कार्यालयाकडे परस्पर जमा करण्यात आले. त्यासोबत हवेली तहसीलदारांचे पत्रही होते. या अर्जांची पोचही दिली वा घेतली गेली नाही. शिरूर तहसील कार्यालयाने या अर्जांची तपासणी न करताच ही नावे यादीत समाविष्ट केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी हा प्रकार उजेडात आणला. यादीत समाविष्ट झालेली नावे बेकायदा असून, त्यांची त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून ती कमी करण्यात यावीत. याबाबत यापूर्वीही तक्रार करण्यात आली आहे. अधिकाऱ्याचा हलगर्जीपणाच यासाठी कारणीभूत आहे, असेही पाचर्णे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सहायक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सुनावणी 
हवेली तहसील कार्यालयातील सहायक निवडणूक अधिकाऱ्यांसमोर या ३४०० मतदारांची सुनावणी होईल. त्यानंतर त्या अर्जदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत निर्णय होऊन दोषींवर कारवाई होईल, असे शिरूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

Web Title: wagholi pune news crime on bogus voter