वाघोली - गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुणांचाही सहभाग

निलेश कांकरिया
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे.  ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून 10 ते 15 तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे. 

वाघोली - वाघोली व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर तरुण पुढे येऊ लागले आहे.  ग्रामसुरक्षा दल, सुरक्षारक्षक संघटना या माध्यमातून 10 ते 15 तरुण दररोज रात्री पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहे. 

या तरुणांना पोलिसानी स्वरक्षणाचे धडेही दिले. 10 ते 15 तरुण दररोज रात्री दुचाकीवर पोलिसांबरोबर गस्त घालण्याचे काम करीत आहेत. वाघोलीसाठी एक पथक व अन्य गावासाठी एक पथक असे दोन पथक गस्तीचे काम करतात. त्यांच्या सोबत दोन पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची टीम असते. त्यांना स्वतंत्र टी शर्ट देण्यात आला आहे. काही सोसायटीचे सदस्य ही याकामी मदत करीत आहेत. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या तरुणांनी एकत्रित येऊन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाघेश्वर सुरक्षा रक्षक संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे सदस्य पोलिसांना मदत करीत आहेत. रात्री गस्त घालताना निदर्शनास येणाऱ्या आक्षेपार्ह बाबी हे सदस्य पोलिसांना कळवितात. आठवडे बाजार परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा मानस या संघटनेने व्यक्त केला. 

या संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल सातव, उपाध्यक्षपदी संदिप शिंदे, सचिवपदी अनिकेत सातव, प्रकाश लोले, खजिनदारपदी जामुवंत कंद यांची निवड झाली असून विकास आव्हाळे, ऋषिकेश दाभाडे, मुकेश सातव, संदिप वारे, निलेश सातव, रवी सातव संघटनेचे सदस्य आहेत.

आम्हाला मदतीसाठी तरुण पुढे येऊ लागले आहेत. 10 ते 15 तरुण दररोज आमच्या पथका सोबत गस्त घालतात. वाघोलीसाठी एक व अन्य गावासाठी एक असे दोन पथक गस्तीचे काम करीत आहेत. त्यांना स्वरक्षणाचे धडेही देण्यात आले आहे. प्रत्येक गावातून अशीच तरुणांची मदत मिळाल्यास गुन्हेगारीला आळा बसेल. 

वाघोलीचा वाढता परिसर, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी गावे, अपुरे पोलिस कर्मचारी या बाबींचा विचार करता पोलिसांना तरुणांच्या मदतीची गरज आहे. यासाठीच संघटनेची स्थापना करून पोलिसांना मदत करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या गस्तीमुळे गुन्हेगारीवर नक्कीच आळा बसेल. 
- अनिल सातव, अध्यक्ष वाघेश्वर सुरक्षा रक्षक संघटना.

Web Title: Wagholi - Youth participation to prevent crime