विकास आराखड्याची प्रतीक्षाच

विकास आराखड्याची प्रतीक्षाच

पुणे - सात हजार चौरस किलोमीटर आणि आठशे गावांचा समावेश असलेल्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याची मुदत दोन महिन्यांत संपुष्टात येणार आहे. या मुदतीत विकास आराखड्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरील ताण कमी व्हावा, तसेच पुणे महानगर क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी पीएमआरडीएची स्थापना केली. त्यामुळे सुमारे सहा चौरस किलोमीटर परिसराच्या विकासाची जबाबदारी पीएमआरडीएवर आहे. जुलै २०१७ मध्ये या संपूर्ण हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचा इरादा पीएमआरडीकडून हाती घेतला होता. पुढील दोन महिन्यांत त्याची मुदत संपुष्टात येत आहे. गेल्या वर्षी पीएमआरडीएच्या हद्दीसाठीच्या बांधकाम नियमावलीस राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे पीएमआरडीएकडून प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाईल, असे अपेक्षित होते. 

मात्र, अद्यापही आराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये विकास आराखडा तयार करण्याची मुदत संपुष्टात येत आहे.

मुदतवाढीचा इरादा? 
स्थानिक स्वराज्य संस्थांनी मुदतीत विकास आराखडा तयार करावा, यासाठी तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य नगररचना कायद्यात राज्य सरकारने बदल केले. त्यानुसार इरादा जाहीर केल्यानंतर प्रारूप आराखडा प्रसिद्ध करून त्यास अंतिम मान्यतेसाठी अडीच वर्षांचा कालावधी दिला. पीएमआरडीएकडून इरादा जाहीर करून दोन वर्षे पूर्ण होत आली. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ घ्यावी लागेल, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आराखड्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पूर्ण  करण्यासाठी कायद्यानुसार सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
-  एक अधिकारी, पीएमआरडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com