प्रॉपर्टी कार्डसाठी प्रतीक्षाच

Property-Card
Property-Card

पिंपरी - शहरातील नागरिकांकडे आपल्या मालमत्तेची माहिती असावी, यासाठी प्रॉपर्टी कार्डचा उपक्रम सुरू केला आहे. मात्र, त्याला प्राधिकरणात गती मिळाली नसल्याचे समोर आले आहे. गेल्या ३० वर्षांपासून या परिसराच्या सर्वेक्षणाचा विषय प्रलंबित असल्याने या भागात ही योजना अद्यापही सुरू झालेली नाही.

आतापर्यंत भूमी आणि अभिलेख विभागाने या भागातील सेक्‍टर दोन आणि इंद्रायणीनगर या परिसराच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे, तर सेक्‍टर दोनच्या सर्वेक्षणासाठी त्यांना सहा लाखांचा खर्च आला आहे. उर्वरित ३५ सेक्‍टरच्या सर्व्हेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसल्याने तेथील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डपासून वंचित राहावे लागत आहे. 

सर्वेक्षणअभावी योजना अशक्‍य
गेल्या काही वर्षांपासून शहराचा चेहरा बदलतो आहे. प्राधिकरण क्षेत्रातदेखील अनेक गृहप्रकल्प, बंगल्यांसह विकासकामे होत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांकडे प्रॉपर्टी कार्ड असणे आवश्‍यक आहे. ज्यामुळे जमिनीचा तपशील, बांधकामाचे क्षेत्र, वर्ष, मूळ मालक आदी माहिती एकाच कार्डवर उपलब्ध होणार आहे. मात्र, प्राधिकरणातील संपूर्ण भागाचे सर्वेक्षण झालेले नसल्यामुळे भूमी अभिलेख विभागाला ही योजना या ठिकाणी राबवणे शक्‍य होत नाही. महापालिकेकडून नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम पुढील वर्षी होणार आहे, त्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे.

प्राधिकरण परिसरातील सर्वेक्षणाबाबत माहिती घेऊन त्यामध्ये लक्ष घालणार आहे. 
- डॉ. दीपक म्हैसकर, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com