वाकडमध्ये अभियंत्याने केला डॉक्टर पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - घरगुती भांडण, पैशाचा वाद व चारित्र्याच्या संशयावरून एका संगणक अभियंत्याने डॉक्टर पत्नीचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी (ता. 13) रात्री दहाच्या सुमारास वाकड येथे घडली. निर्दयीपणे पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पतीला वाकड पोलिसांनी कात्रज येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेत अटक केली.

पुणे - घरगुती भांडण, पैशाचा वाद व चारित्र्याच्या संशयावरून एका संगणक अभियंत्याने डॉक्टर पत्नीचा गोळ्या घालून खून केल्याची घटना बुधवारी (ता. 13) रात्री दहाच्या सुमारास वाकड येथे घडली. निर्दयीपणे पत्नीचा खून करून पळून जाणाऱ्या पतीला वाकड पोलिसांनी कात्रज येथून मोठ्या शिताफिने ताब्यात घेत अटक केली.

मनोज पाटीदार (वय 40) रा. ओझोन पार्क वाकड असे अटक केलेल्या खूनी अभियंत्यांचे नाव आहे. गुरूवारी (ता. 14) त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली. अंजली मनोज पाटीदार (वय 30, रा. वाकड) असे खून झालेल्या डाँक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंजलीचा भाऊ अमर संतराम चंदनव (वय 32) रा. अनुदीप सोसायटी लोहगाव यांनी फिर्याद दिली आहे.
 

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज पाटीदार हा संगणक अभियंता असून हिंजवडी येथील टीसीएस कंपनीमध्ये नोकरीस आहे. अंजली ही त्याची तिसरी बायको असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने 2011 साली मुंबई येथे एका तरूणीशी विवाह केल्याची माहीतीही पोलिसांना मिळाली आहे. त्या पत्नीचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचे समजते. तर त्यानंतर कोंढवा येथे आठव्या मजल्यावरून पडून त्याच्या दुसऱ्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
 

अंजली व मनोजचा पाचवर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन वर्षाचा एक चिमुरडा मुलगा आहे. अंजलीचा वाकड येथील शेड्गेवस्ती येथे मदर केयर नावाचा दवाखाना आहे. बुधवारी किरकोळ कारणाहून रात्री त्यांच्यामध्ये भांडण झाले. रागाच्या भरात मनोजने रुग्णालयातच अंजलीवर पिस्तुल रोखून गोळीबार केला. या हल्ल्यात तिच्या डोक्यातून गोळी आरपार शिरल्याने अंजलीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर मनोज पळून गेला होता मात्र पोलिस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत त्याचे मोबाईलवरून व गाडीनंबरचा शोध लावून अवघ्या चार तासात मनोजला कात्रज येथे पक़डून ताब्यात घेतले.
 

चिमुरड्याचा आक्रोश....
अंजलीचा खून झाला त्यावेळी या दाम्पत्यांचा दोन वर्षाचा चिमुरडा मुलगा प्रयाग हा दवाखान्यातच होता. त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या आईचा खून झाला व ती रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळल्याचे पाहून तो आपल्या आईसाठी आक्रोश करीत दवाखान्याबाहेर आला. मात्र त्याचा निर्दयी बाप त्याला तेथेच सोडून फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Wakad engineer in the murder of doctor wife