पुणे: थेरगावमध्ये 67 लाखांच्या नव्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे - थेरगाव परिसरातील प्रसूनधाम सोसायटीतील एका कारमधून 67 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा कारमधून घेऊन जाणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना लागली होती. त्यानुसार त्यांनी आज (बुधवार) सकाळी प्रसूनधाम सोसायटीमध्ये छापा टाकत ही रोकड जप्त केली. तसेच चार जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. या चौघांची चौकशी करण्यात येत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयापासून देशभरात रोकड सापडण्याच्या घटना घडत आहेत. पुण्यातही आतापर्यंत दोन-तीन ठिकाणी कारवाई करत नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आता नव्या नोटाही सापडत आहेत.

Web Title: Wakad police seized 67 lakhs cash in new Rs.2000 notes from a car near PrasunDham society in Thergaon