चांद्रयान-2 मोहिमेत वालचंदनगर कंपनीचे योगदान

Booster
Booster

वालचंदनगर : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) सध्या चांद्रयान-2 मोहिमेमध्ये व्यस्त आहे. चांद्रयान-2 15 जुलैला अवकाशामध्ये झेपवणार असून या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोहिमेत वापरले जाणारे बुस्टर आणि यानाला दिशा देणाऱ्या नोझल कंट्रोल टँकेज या उपकरणांची निर्मिती वालचंदनगर (ता. इंदापूर) कंपनीने केली आहे. चांद्रयान-2 मध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई यांनी दिली.

या माेहिमेसाठी वालचंदनगर कंपनीने 80 फुटापेक्षा जास्त उंची व 12 फुटापेक्षा जास्त व्यास असणारे बुस्टर तयार केले असून या बुस्टरचे तीन भाग आहेत. या बुस्टरमध्ये घनस्वरुपात इंधन भरले जाते. मोहिमेतील पहिल्या टप्प्यात याचा उपयोग होतो. बुस्टर हे यानाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस बसविण्यात येते. हे यान हवेमध्ये झेपावल्यानंतर यानाला दिशा देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नोझल कंट्रोल टँकेजची निर्मिती देखील वालचंदनगर कंपनीने केली आहे. वालचंदनगर कंपनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशउभारणीच्या कामामध्ये मोलाची मदत करीत आहे.

सध्या कंपनी एरोस्पेस, डिफेन्स आणि न्युक्लिअर क्षेत्रामध्ये कार्यरत असून अणुऊर्जासाठी लागणारी महत्त्वाची उपकरणे बनवत असल्यामुळे देशाला जगातील इतर देशांवर अवलंबून राहावे लागत नाही. तसेच मिसाईल व आण्विक पाणबुडीचे महत्त्वाचे भाग बनविण्यामध्ये कंपनीचा सहभाग आहे. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञान वापरून पूर्ण कार्यक्षमतेने देशाच्या प्रगतीसाठी काम सुरू केले असल्याचे पिल्लई यांनी सांगितले.

वालचंदनगरचा १०० टक्के सक्सेस रेट
वालचंदनगर कंपनी १९७३ पासून अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये इस्त्रोशी सलग्न काम करीत आहेत.इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे. चांद्रायान-1 व मंगळयान मोहिमेमध्ये  वालचंदनगर कंपनीचा सहभाग होता. तसेच कंपनीचा सक्सेस रेट शंभर टक्के असून चांद्रायान-2 मोहिम यशस्वी होणार असल्याचा विश्‍वास कपंनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांनी व्यक्त केला.

चांद्रयान-2 मोहिम
अकरा वर्षांपूर्वी 2008 मध्ये भारताने चांद्रयान मोहिम राबवली होती. अकरा वर्षानंतर चांद्रयान-2 मोहिम राबविण्यात येत आहे. ‘जीएसएलव्ही मार्क-3’ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे यान चंद्रावरती पाठविण्यात येणार आहे. चांद्रयान-2 चे वजन सुमारे 3.8 टन असणार आहे. 6 सप्टेंबरनंतर चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com