चांद्रयान - 2 मोहिमेत वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग

राजकुमार थोरात
मंगळवार, 23 जुलै 2019

मोहिमेच्या यशस्वीमुळे वालचंदनगर कंपनीच्या शेरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांनी दिली.

वालचंदनगर (पुणे) : भारताची महत्वकांक्षी चांद्रायान - 2 मोहिम यशस्वी झाली असून या माेहिमेमध्ये  वालचंदनगर (ता. इंदापूर) वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे. मोहिमेच्या यशस्वीमुळे वालचंदनगर कंपनीच्या शेरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांनी दिली.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) काल (ता. 22) चांद्रयान जीएसएलव्ही मार्क -3’ या प्रक्षेपकाच्या साहय्याने चंद्राकडे यशस्वीरित्या झेपावले. या मोहिमेच्या उड्डाणासाठी आवश्‍यक असणाऱ्या बुस्टर व यानाला दिशा देणाऱ्या  नॉझल कंट्रोल टॅंकेज या उपकरणाची यशस्वी  निर्मिती केली आहे. बुस्टर हे 80 फुटापेक्षा जास्त उंची असणारे व 12 फुटापेक्षा जास्त डायमीटर असणारे महत्वाचे उपकरण होते. याची जोडणी तीन टप्यांमध्ये करण्यात आली. बुस्टर हे यानाच्या उजवीकडे व डावीकडे वापरले जातात. बुस्टरमध्ये घन स्वरुपातील इंधन असते.  ही उपकरणे पहिल्या स्टेजच्या उड्डानासाठी वापरली जातात.  तसेच यान हवेमध्ये झेपवल्यानंतर यानाला दिशा देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नॉझल कंट्रोल टॅंकेजची निर्मिती वालचंदनगर कंपनी यशस्वी केली आहे.

यानाला चंद्रावर पोहचविण्यामध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे. अकरा वर्षापूर्वी 2008 मध्ये भारताने चांद्रायान मोहिम राबवली होती. तसेच मंगळयान मोहिमेमध्ये ही वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग होता. वालचंदनगर कंपनी स्वातंत्रय पूर्व काळापासुन देशउभारणीच्या कामामध्ये मोलाची मदत करीत आहे.सध्या कंपनी एरोस्पेस, डिफेन्स, न्यूक्लिअरमध्ये कार्यरत असून देशउभारणीसाठी गरज असणारी  महत्वाची उपकरणे बनवत असल्यामुळे देशाला जगातील इतर देशावरती अवलंबून राहावे लागत नाही. तसेच मिसाईल व आण्विक पाणबुडीचे महत्वाचे भाग बनविण्यामध्ये कंपनीचा सहभाग आहे. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञान वापरुन पूर्ण कार्यक्षमतेने देशाच्या प्रगतीसाठी काम सुरु केले असल्याचे पिल्लई यांनी सांगितले

गगनयान मोहिमेमध्ये ही कंपनीचा सहभाग...
यासंदर्भात वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांनी सांगितले की,चांद्रायान - 2 मोहिम यशस्वी झाल्याचा आम्हाला अभिमान आहे.  इस्त्रोच्या गगणयान मोहिमेमध्ये ही  कंपनीचा माेलाचा वाटा राहणार असून यासाठी उपकरणे बनविण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walchandnagar company contributes major in Chandrayan 2 mission