निमसाखरमध्ये एक हजार जांभळाच्या झाडांची लागवड....

राजकुमार थोरात
बुधवार, 6 डिसेंबर 2017

वालचंदनगर - कामाचा ताण,बदलता आहार व राहणीमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परीणाम होत असुन अनेक नागरिकांना मधूमेहाचा  अाजार जडू लागला आहे.भविष्यातील तरुण पिढीला हा आजार होवू नये,पर्यावरणाचे संतुलन राहावे,स्वच्छ हवा मिळावी यासाठी  निमसाखर(ता.इंदापूर)येथील ग्रामपंचायतीने गावामध्ये एक हजार जांभळाच्या झाडे लावण्यास सुरवात केली आहे.  सातशे झाडांची लागवड पूर्ण झाली असून या आठवड्यामध्ये उर्वर्रित तीनशे झाडांची लागवड पूर्ण हाेणार आहे. 

झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश शासकीय,सामाजिक संस्थेकडून  सर्वांनाच मिळतो.मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी झाडे ही फक्त कागदोपत्रीच लावली जातात.मात्र याला अपवाद आहे इंदापूर तालुक्यातील निमसाखर ग्रामपंचायत...माजी सरपंच गोंविंद रणवरे हे गावच्या विकासासाठी सतत नाविण्यपूर्ण योजना राबवत असतात.त्यांनी पाठपुरावा करुन गावासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

गावामध्ये झाडे असावीत यासाठी त्यांनी वृक्षारोपनाची मोहिम हातामध्ये घेतली आहे.लावलेल्या झाडांचा पुढील पिढीसाठी उपयोग होणे गरजेचे असल्याने त्यांनी निमसाखर गावामध्ये गावठाणामध्ये एक हजार जांभळांच्या झाडांच्या लागवड करण्याचे काम सुरु आहे. यासाठी त्यांनी नर्सरीमधून  जांभळाची टिशू कल्चर मोठी झालेली रोपे आणली असुन दोन झाडामधून दहा फुट अंत ठेवून त्यांनी लागवड केली आहे. सुमारे तीन वर्षामध्ये झाडांना जांभळे लागणे अपेक्षीत असून सर्वांना जांभळांचा आस्वाद घेण्यास मिळेल असे पंचायत समिती सदस्या सुर्वणा गाेविंद रणवरे, सरपंच अरुणा शामराव चव्हाण, उपसरपंच गौरी संजय जाधव यांनी सांगितले.

यासंदर्भात पर्यावरणाचे आभ्यासक महेश गायकवाड यांनी सांगितले की,जांभळाचे झाडांचे अनेक उपयोग आहेत. मधूमेहासाठी जांभळाच्या झाडांची फळे,बिया,साल या अंत्यत गुणकारी एक प्रकारचे वरदान आहे. मधूमेह असणाऱ्या नागरिकांनी दिवसामध्ये दहा जांभळे एक महिनाभर नियमित खालल्यास मधूमेहाचा अाजार कमी होण्यास निश्‍चित मदत होते. तसेच उलटीचा त्रास होत असल्याचे जांभळाची पाने खालल्यास उलटी बंद होते.सर्वार्धिक ऑक्सिजन देणारे झाड असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: walchandnagar pune news 1000 jamun tree plantation