रावेत चौक ठरतोय अपघात स्थळ

ज्ञानेश्वर भंडारे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

वाल्हेकरवाडी - रावेतमधील तुकाराम पुलाजवळील चौकात बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांचे अतिक्रमण, पोलिसाचा अभाव या कारणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, दररोज छोटे-मोठे तीन ते चार अपघात होत आहेत. या सर्व समस्यांनी रावेत चौक अपघाती ठरू लागला आहे. 

वाल्हेकरवाडी - रावेतमधील तुकाराम पुलाजवळील चौकात बेशिस्त वाहनचालक, व्यावसायिकांचे अतिक्रमण, पोलिसाचा अभाव या कारणांनी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. परिणामी, दररोज छोटे-मोठे तीन ते चार अपघात होत आहेत. या सर्व समस्यांनी रावेत चौक अपघाती ठरू लागला आहे. 

आयटीयन्सची निवासनगरी म्हणून रावेत नावारूपाला येत आहे. सकाळी कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी आणि सायंकाळी घर लवकर येण्यासाठी रावेत सोईचे जात आहे. मात्र, रावेतच्या वाढलेल्या नागरीकरणाच्या तुलनेत विकास झालेला नाही. रावेतला इतर उपनगरांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यातही बीआरटी आल्याने रस्ता आणखी कमी झाला. पुणे-मुंबई हा द्रुतगती महामार्ग जवळ असल्याने निगडी, डांगे चौक, वाल्हेकरवाडी, आकुर्डी आदी ठिकाणांहून दररोज शेकडो अवजड व लहान वाहने जातात. हा चौक देहूरोड पोलिस स्टेशनच्या अंकित येतो. तेथील पोलिस ठाण्यातील अपुऱ्या संख्या बळामुळे येथे पोलिस अभावानेच आढळतात.

कोंडीचे परिणाम 
 महिनाभरात छोटे-मोठे ९० अपघात
 कोंडीमुळे प्रदूषणात वाढ
 वेळेचा अपव्यय
 तातडीच्या सेवेचा अभाव 

कोंडीवर उपाय
 वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई हवी
 कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती हवी
 झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे गरजेचे
 चौकातील गोलाई कमी करण्याची गरज

रावेतमध्ये वाहतुकीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. बास्केट ब्रीज रावेत चौकात सतत रहदारी असते. चौकात ट्रॅफिक पोलिस नसल्याने वाहतूक कोंडी होते. मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वे जवळ असल्याने शनिवार, रविवारी वाहतुकीत भर पडते. येथे वाहतूक पोलिसाची गरज आहे.
- प्राजक्ता रुद्रवार, रावेत

चौकातील सिग्नल सुरू झाल्यानंतर येथे वाहतूक पोलिस असणे गरजेचे आहे. या चौकात सिग्नल असला तरी त्याला कोणीही वाली नसतो. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते.
- मुंजाजी शिंदे, विद्यार्थी

वाहतूक कोंडीची कारणे
 रावेतमधून बाहेर पडण्यास एकमेव रस्ता 
 भूसंपादनाअभावी रखडले अंतर्गत कामे
 नियंत्रण दिवे बंद
 चौकात व्यावसायिकांचे अतिक्रमण
 रिक्षाचालकांचा भरचौकात रिक्षाथांबा
 बेशिस्त वाहनचालक

Web Title: walhekarwadi news pune news ravet chowk accident place