जागतिक आरोग्य दिनानिमित्त 'वॉक फॉर गुड हेल्थ '

मिलिंद संधान
शनिवार, 7 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नाना काटे सोशल फाउंडेशन व समरीटन्स या सेवाभावी संस्थेच्या वतीने पिंपळे सौदागर येथे आज सकाळी ' वॉक फॉर गुड हेल्थ ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नगरसेवक नाना काटे, रोझलँण्ड सोसायटीचे चेअरमन संतोश म्हसकर, आनंद दप्तरदार, नंदकुमार काटे, संदेश काटे, काळुराम कवितके यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी लहान मुले तीन व मोठी माणसे पाच किलोमिटर अंतर चालले. या वॉक फॉर गुड हेल्थ ची सुरूवात रोझ आयकॉन शेजारील मनपाच्या मैदानातून झाली, त्यानंतर पुढे शिवार चौक, कोकणे चौक, रहाटणी पर्यंत सहभागी लोक चालले. यावेळी दुष्काळ व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरीता काम करणारी ' स्नेहवन ' या संस्थेकरीता मदतनिधी ही जमविण्यात आला. 

नगरसेवक नाना काटे म्हणाले, " आरोग्यासाठी चालणे, ते करीत असताना वंचीतांकरीता मदत गोळा करणे. अशा या सेवाभावी कामात मला सहभागी होण्याची संधी मिळाली याचे मनोमन समाधान वाटते. आमच्या येथील रोझलँण्ड सोसायटीकडून स्नेहवनच्या मुलांना दुरूस्त केलेल्या सायकलीही भेट दिल्या जाणार आहे. " 

Web Title: walk for good health worl health day