...अन्‌ भिंत बोलू लागली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पुणे - कोथरूड कचरा डेपोची जुनी भिंत. पदपथावरच अस्वच्छता आणि कचरा. पण, हे चित्र आता पालटले असून ही भिंत जणू बोलू लागली आहे. नामवंत चित्रकार, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि चिमुकल्या हातांनी या भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली असून, ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

शहरात ठिकठिकाणी भिंतीवरची कलाकृती ही संकल्पना रूढ होत असून; बोडक्‍या, घाण आणि जाहिरातींनी बरबटलेल्या सार्वजनिक भिंतींवर आकर्षक चित्रे रेखाटली जात आहेत. कोथरूडच्या जुन्या कचरा डेपोबाहेरील भिंतीवर ‘स्ट्रीट आर्ट’ हा उपक्रम राबविण्यात आला. वास्तुरचनाकार व पर्यावरण नियोजक अनघा परांजपे-पुरोहित यांनी हा उपक्रम राबविला. यात चित्रकार राजू सुतार, वैशाली ओक आणि संजय टिक्कल यांचाही सक्रिय सहभाग होता.

कात्रज येथील साई कॉलेज ऑफ आर्टचे २५ विद्यार्थी, कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरमधील प्रा. सोनल निर्मळ आणि विद्यार्थी, ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या प्राचार्या पूर्वा केसकर आणि पुण्यातील वास्तुरचनाकार सहभागी झाले होते. आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, भाजपचे सरचिटणीस उज्ज्वल केसकर यांनीही कलाकृती साकारण्याचा आनंद लुटला. 
याबाबत अनघा परांजपे-पुरोहित म्हणाल्या, ‘‘भिंतीवरील या कलाकृतीमुळे हा भाग स्वच्छ आणि सुरक्षित असल्याची जाणीव होते आहे. सार्वजनिक कलेचे महत्त्व लोकांना पटले असावे असे वाटते. समोरच्या वस्तीतील अनेक महिला आणि मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला याचा आनंद आहे.’’ 

Web Title: wall painting in city