शाळांना ‘क्रेझ’ वॉल पेंटिंगची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

तहानलेला कावळा... आकाशगंगा... अल्लादीन... मछली जलपरी... अशा बालकथांतील पात्रांबरोबरच छोटा भीमसारखे कार्टून शहरातील बहुतांश खासगी शाळांमधील भिंतीवर पाहायला मिळत आहेत. वॉलपेपरच्या जमान्यात आता वॉल पेंटिंगची क्रेझ शाळांमध्ये आहे.

पिंपरी - तहानलेला कावळा... आकाशगंगा... अल्लादीन... मछली जलपरी... अशा बालकथांतील पात्रांबरोबरच छोटा भीमसारखे कार्टून शहरातील बहुतांश खासगी शाळांमधील भिंतीवर पाहायला मिळत आहेत. वॉलपेपरच्या जमान्यात आता वॉल पेंटिंगची क्रेझ शाळांमध्ये आहे. 

शाळांचे आंतर्बाह्य स्वरूप बदलत असताना पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील कल्पकतेने सजविलेले वर्ग अतिशय सुंदर अनुभव देत आहेत. विशेषतः पूर्वप्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या चित्रांच्या साह्याने, हसतखेळत व आनंददायी शिक्षण दिले जात आहे.  

वॉल पेंटिंगचा खर्च लाखावर
शाळा संस्थाचालकांच्या मागणीनुसार कल्पकता वापरून वॉल पेंटिंग केले जाते. अशा प्रकारच्या चित्रांना परदेशात जास्त मागणी आहे. जनजागृतीसाठी या कलेचा वापर होतो. त्यासाठी प्रति चौरस फुटाप्रमाणे खर्च येतो. अनेक शाळा त्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. शाळांमध्ये लहान मुलांना आवडतील अशी कार्टूनमधील पात्र तसेच विविध सण, आकाश, रस्ता, इंद्रिये, बैठे-मैदानी, पारंपरिक खेळ, फळे, महाराष्ट्राची संस्कृती, पाळीव प्राणी, जलचर प्राणी, रंग, फुले, प्रथमोपचाराची साधने, वैज्ञानिक साधने, असे अनेक विषय निवडले जातात. काही शाळांमध्ये विज्ञान आणि गणितामधल्या मूलभूत संकल्पना, भूगोलातील मूलभूत तत्त्वे अशा अनेक विषयांवरील प्रतिकृती, माहितीपूर्ण चित्रे रेखाटली आहेत  ही भिंतीवरील चित्र सर्वांना आकर्षित करत असल्याचे शिक्षिका शीला भोगावडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wall Painting Craze in School