Video : पुण्यातील झेड ब्रिजचा संरक्षक कठडा कोसळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पुणे : डेक्कन आणि नारायण पेठला जोडणाऱ्या काकासाहेब गाडगीळ पुल म्हणजेच झेड ब्रिज पुलाच्या संरक्षक कठड्याचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. पावसामुळे हा कठडा कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असून परिणामी, वाहन चालकांनी या पुलावरुन जाण्याऐवजी अन्य रस्त्याचा वापर केला आहे. 

पुणे : डेक्कन आणि नारायण पेठला जोडणाऱ्या काकासाहेब गाडगीळ पुल म्हणजेच झेड ब्रिज पुलाच्या संरक्षक कठड्याचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. पावसामुळे हा कठडा कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असून परिणामी, वाहन चालकांनी या पुलावरुन जाण्याऐवजी अन्य रस्त्याचा वापर केला जात आहे. 

दरम्यान, कठडा कोसळ्याने पुल कोसळण्याची नागरिकांमध्ये चर्चा  होती. मध्यरात्री ट्रक कठड्य़ाला धडकल्याने हा प्रकार घडल्याचे काही नागरिक सांगत आहे. मात्र, हा कठडा का कोसळला हे महापालिका आणि वाहतूक पोलिसांना सांगता आले नाही. त्यामुळे या कठडा कोसळ्याचे गुढ वाढले आहे.

या पुलावर दोन्ही बाजुला संरक्षक कठडा आहे. डेक्कन येथील शिवसेना भवनाच्या मागील बाजुला कठडा कोसळल्याचे शनिवारी निदर्शनास आले. त्यानतर वाहन चालकांमध्ये भिती निर्माण झाली आणि परिणामी त्या पुलावरील वाहतूक मंदावली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wall of the Z bridge in Pune collapsed