हरवलं कोथरूडमध्ये, सापडलं पंढरपूरात; चोरलेल्या पाकिटाची भन्नाट कथा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

तीन महिन्यांपूर्वी रघुनाथ कुलकर्णी यांचे पुण्यात हरवलेले पाकीट पंढरपुरात विठ्ठलाच्या दानपेटीत सापडेले आहे. रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, पाकिट हरवल्याची तक्रार मी कोणाकडेही केली नव्हती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या हुंडी पेटीत ते सापडले. पुन्हा हे पाकीट मिळाल्याने आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे : तीन महिन्यांपूर्वी रघुनाथ कुलकर्णी यांचे पुण्यात हरवलेले पाकीट पंढरपुरात विठ्ठलाच्या दानपेटीत सापडेले आहे. रघुनाथ कुलकर्णी यांनी सांगितले की, पाकिट हरवल्याची तक्रार मी कोणाकडेही केली नव्हती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या हुंडी पेटीत ते सापडले. पुन्हा हे पाकीट मिळाल्याने आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

रघुनाथ कुलकर्णी म्हणाले, माझे पाकीट पुणे येथील कोथरुडमध्ये हरवले होते. ते विठ्ठलाच्या हुंडीपेटीत सापडले हा देवाचा महिमाच समजावा लागेल. याबाबत मला मंदिर समिती कर्मचाऱ्यांकडून संपर्क करण्यात आला, त्यानंतर हे पाकिट मला मिळाले.' 

तानाजी चित्रपटातील दृष्यावरून वाद चिघळल

रघुनाथ पुरुषोत्तम कुलकर्णी (रा. औरंगाबाद, सध्या कोथरुड, पुणे) यांचा मुलगा पुणे येथे राहतो. त्यामुळे ते मुलाकडे राहण्यासाठी आले होते. तीन महिन्यापूर्वी त्यांचे पाकीट कोथरुड येथे हरवले होते. त्यामध्ये २ हजार ४१० रुपये, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. तसेच मुलाला देखिल सांगितले नाही. पण, पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील हुंडीपेटीतील दान मोजताना त्यांचे पाकीट आढळून आले. मंदिरातील कर्मचारी संभाजी देवकर, तुकाराम कुलकर्णी, विशाल देवकते, मिलिंद माने यांनी संबंधित कागदपत्राच्या आधारे रघुनाथ कुलकर्णी यांचा मोबाईल नंबर शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून पाकीट व त्याच्यातील वस्तू घेऊन जाण्यास सांगितले, अशी माहिती मंदिर समितीचे लेखापाल सुरेश कदम यांनी दिली.

पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सुरक्षा कर्मचारी नामदेव शीलवंत हे सोमवारी विठ्ठल गाभारा येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना दर्शन रांगेमध्ये ९ हजार १३० रुपयांसह पिशवी सापडली. ती पिशवी पुणे येथील भाविक रत्नमाला सतीश जाधव (वय ६४) यांची असल्याची खात्री करुन त्यांना परत देण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. 

टाटा स्टीलच्या तीन हजार कर्माचाऱ्यांची जाणार नोकरी

अनेक भाविक मंदिरात वस्तू, पैसे विसरतात. त्या वस्तू सापडल्यास मंदिर समितीचे कर्मचारी त्यांना नि:स्वार्थीपणाने परत करतात. त्याच पद्धतीने मंदिराच्या हुंडीपेटीत एक पाकीट सापडले होते. त्याबाबत संबंधित व्यक्तीला संपर्क साधून ते घेऊन जाण्यास सांगितले असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wallet lost in Pune found at Pandharpur