गेला रस्ता कोणाकडे ? मनसे करणार खळ्ळं खट्याकं

Walunj Sthal to Samruddhi Nagar road not repaired vandalism agitation by MNS in Rajgurunagar
Walunj Sthal to Samruddhi Nagar road not repaired vandalism agitation by MNS in Rajgurunagar

राजगुरूनगर : येथील वाळुंजस्थळ ते समृध्दीनगर रस्त्याची दुरुस्ती आठ दिवसांत न केल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजगुरूनगर नगरपरिषदेत, खळ्ळं खट्याकं म्हणजे तोडफोड आंदोलन करणार असल्याचा जाहीर इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. दरम्यान या रस्त्यावर काम पंचायत समितीने करायचे की नगरपरिषदेने, असा वाद आता रंगला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वाळुंजस्थळ ते समृध्दीनगर रस्त्यावर खड्डे पडल्याने तो खराब झाला आहे. याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांनी २२ जुलैला नगरपरिषदेला सदर रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने त्यांनी  नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा पुन्हा १० ऑगस्टला दिला. त्यानंतर, या रस्त्याचे काम पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने  केले असल्याने, पंचायत समितीलाच या रस्त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र दिले असल्याचे, नगरपरिषदेने मनसेला कळविले. 

नगरपरिषदेने जरी पंचायत समितीला दुरुस्ती करावी, असे पत्र दिले असले तरी, पुणे जिल्हा परिषदेने, नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यांवर काम करू नये, असा ठराव मागेच मंजूर केलेला आहे. विशेष म्हणजे त्यावेळी राजगुरूनगर नगरपरिषदेनेच, आपल्या हद्दीतील रस्त्यांमधून सांडपाणी योजनेचे काम करायचे असल्याने, जिल्हा परिषदेने या रस्त्यांवर काम करू नये, अशी हरकत घेतली होती. असे पत्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नगरपरिषदेला दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

दरम्यान या पत्रापत्रीत कामाबाबत मात्र कार्यवाही होत नसल्याने मनसेने, शुक्रवारी (१४ ऑगस्टला नगरपरिषदेला रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास २८ ऑगस्टला तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. तसेच कोरोनाबाबतच्या नियमावलीमुळे समीर थिगळे, मंगेश सावंत, सोपान डुंबरे आदी मोजक्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनेही केली. तसेच आता नगरपरिषदेचा जाहीर निषेध करीत आंदोलन करण्याचे फलकही लावले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com