भटक्‍या मांजरांचा उपद्रव वाढतोय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

मांजरीची नसबंदी करायला आमच्याकडे साधनसामग्री नाही. त्यात मांजरे पकडायला आम्हाला माणसे मिळत नाहीत. त्यामुळे अशा भटक्‍या मांजरांची संख्या वाढतच चालली आहे.
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी

नवी सांगवी - मोकाट जनावरे, भटकी कुत्री, डुकरे यांच्याबरोबर आता मांजरांच्या त्रासाच्याही तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऐरवी दिसायला निष्पाप असलेल्या मांजरांचा नकळत उपद्रव वाढू लागला आहे. सांगवी, पिंपळे गुरव तसेच पिंपळे सौदागर येथील बैठ्या घरांपासून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये भटक्‍या मांजरांच्या त्रासाला नागरिक वैतागले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

एरवी रात्री-अपरात्री अंगावर धाऊन येणारे कुत्रे तसेच रस्त्यात ठाण मांडून बसलेली जनावरे हा नित्याचा वादाचा विषय असला तरी त्यात कमी म्हणून काय मांजरांचीही भर पडत आहे. 

मध्यरात्री तसेच पहाटेच्या वेळी मांजरांच्या आपापसातील भांडणे व जोरजोरात गुरगुरण्यामुळे लोकांची झोपमोड होत असते. वाघाची मावशी म्हणून परिचित असलेल्या मांजरांचा अवघड ठिकाणी वावरत असतो. तसेच मांजरांची भांडणे तासन्‌तास सुरू असते. 
अत्यंत अरुंद बोळात, गच्चीवर, पार्किंगमध्ये वाहनांच्या खाली वा उघड्या नाल्यात हे सहजच लपून बसतात. त्यामुळे अशा मांजरांना हुसकावून लावणेही अवघड होऊन बसते.

सध्या स्मार्ट सिटी धर्तीवर रस्ते, गल्लीबोळ खणून ठेवल्याने मांजरे तेथे घाण करून ठेवतात. काही लोक हौसेपोटी मांजर पाळतात. परंतु त्यानतर तिला झालेली पैदास इतरत्र सोडून दिले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wandering cats are on the rise