वानवडी : महापौर आपल्या दारी उपक्रम

संदिप जगदाळे
रविवार, 20 मे 2018

हडपसर : महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक यांच्या समोर नागरिकांनी अनेक प्रश्नातुन आपली गा-हाणी मांडली. 

हडपसर : महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे 'महापौर आपल्या दारी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महापौर मुक्ता टिळक यांच्या समोर नागरिकांनी अनेक प्रश्नातुन आपली गा-हाणी मांडली. 

गोसावी वस्ती येथील शौचालयाची दुरुस्ती करावी, पालिकेच्या शाळेच्या जवळील बीपीएल बचत गटाला शालेय पोषण आहाराचे काम द्यावे, जांभूळकर चौकातील साई सागर हॉटेलचे घाण पाणी सोडले जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे, वानवडी पालिकेच्या दवाखान्यातील पहिल्या मजल्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे, शिंदे छत्रीच्या पादचारी मार्गावर शेड मारून नारळाचे दुकान थाटले आणि त्यामुळे पादचा-यांची गैरसोय होते, नेताजी नगर सोसायटीच्या परिसरात भटके कुत्र्याचा सुळसुळाट असून सहा जणांना चावा घेतला असून अधिकाऱ्यांना याबाबत गांभीर्य नाही, वानवडीतील मोठा नाला साफ केला जात नाही, रामटेकडी रामनगर येथील रेल्वे लाईन शेजारील 125 घरांना रेल्वेच्या नोटिसा दिल्या आहे,.

महिलांना पालिकेच्या योजनांचा लाभ मिळत नाही, शिवरकर रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र ते शिवरकर गार्डन पर्यंत रस्त्याच्या कामात पिण्याच्या पाईप लाईन नादुरुस्त झाल्याने कमी दाबाने पाणी येत असल्याने नवीन पाईप लाईन द्वारे पाणी द्यावे, रामटेकडी येथे कचरा प्रकल्प आणू नये, सेंट पॅट्रिक सोसायटीकडे जाणाऱ्या सोलापूर रोडवरील बीआरटी चौकात सिग्नल बसावावा, शिवकर वस्ती येथे अनुधिकृत बांधकामावर कारवाई करावी, जांभूळकर चौक ते जगताप चौक दरम्यान पादचारी मार्ग व रस्त्यावर फळ विक्रते, भाजी विक्रत्यांचे दुकान थाटल्याने नागरिकांना चालायला रस्ता उरला नाही, अतिक्रमानवर कारवाई करावी, जांभूळकर चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारे मटणाचे पत्र्याचे शेड कधी काढणार, प्रभाग क्र.२५ मध्ये क्रीडांगणचे आरक्षण आहे मात्र क्रीडांगण का होऊ दिल जात नाही, राज्य राखीव पोलीस दलाने बाहेरील नागरिकांना रस्ता द्यावा, फातिमानगर चौकात कॅन्टोमेंट बोर्डाचा टोल नाका काढावा, वानवडी गावात कचरा साफ केला जात नाही, असे विविध प्रश्न नागरिकांनी महापौर व अधिकाऱ्यांसमोर मांडले. 

याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, प्रभाग समिती अध्यक्ष हाजी गफूर पठाण, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक अशोक कांबळे, कलिंदा पुंदे, धनराज घोगरे, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, सहायक आयुक्त संजय गावडे सह सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Wanwadi: Mayor at your door