पुजा चव्हाणचा लॅपटॉप देण्याबाबत नगरसेवक धनराज घोगरे यांना वानवडी पोलिसांकडून नोटीस

Pooja-Chavan
Pooja-Chavan

सत्य लपविण्यासाठी पोलिसांकडून नगरसेवकावर दबाव टाकला जात असल्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
घोरपडी - टिकटॉक स्टार पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिचा मोबाईल, लॅपटॉपविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. पोलिसांनी तिचा मोबाईल त्यांच्याकडे असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी नगरसेवक धनराज घोगरे यांना पुजाचा लॅपटॉप देण्याविषयी त्यांना नोटीस बजावली. दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वानवडी पोलिसांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. "सत्य लपविण्यासाठी पोलिसांकडून नगरसेवकावर दबाव टाकला जात आहे, ' असा आरोप भाजपने शनिवारी केला.

पुजा चव्हाणच्या आत्महत्येच्या घटनेनंतर व्हायरल झालेल्या मोबाईल क्‍लिप तसेच मागील काही दिवसांपासून पुजाचे फोटो, व्हिडीओ व अन्य माहिती दूरचित्रवान्यांवर झळकत आहे. या प्रकरणामध्ये वानवडी पोलिसांकडून आत्तापर्यंत पुजाचा मोबाईल तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र काही दिवसांपासून पुजाचा मोबाईल वानवडी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र पुजाचा लॅपटॉप नेमका कोणाकडे आहे, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र लॅपटॉपमधील फोटो, व्हिडीओ दररोज दूरचित्रवाणीवरमध्ये दिसू लागले आहे. या पार्श्‍वभुमीवर वानवडी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांना शुक्रवारी नोटीस पाठविली. पुजाचा लॅपटॉप पोलिसांना परत करावा, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्‍वभुमीवर शनिवारी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, नगरसेवक धनराज घोगरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वानवडी पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी नगरसेवक घोगरे यांनी आपण संबंधीत तरुणीला माणुसकीच्या नात्याने मदत करण्यासाठी गेलो, मात्र आपल्याकडे तिचा लॅपटॉप नाही, कार्यकर्त्याला मोबाईल सापडला होता, तो मोबाईल पोलिसांकडे तत्काळ जमा केला. तरही केवळ भाजपचा नगरसेवक असल्याने आपल्याला नोटीस पाठविली जात असल्याचे सांगितले.

'भाजपच्या नगरसेवकावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांकडून केले जात आहे. या प्रकरणामध्ये एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्यानंतरही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ सत्या लपविण्यासाठी तसेच दबाव टाकण्यासाठी भाजपच्या नगरसेवकाला नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आम्ही अशा कोणत्याही नोटीशीला घाबरणार नाही.'
- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजप.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com