भविष्यात ‘सायबर’ व ‘स्पेस’वरून युद्ध होईल - भूषण गोखले

बावधन - राष्ट्रीय परिषदेत सायबर सुरक्षा विभागाचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांना ‘सूर्यदत्ता नॅशनल सायबर इंटेलिजन्स अवार्ड’ने सन्मानित करताना डॉ. संजय चोरडिया.
बावधन - राष्ट्रीय परिषदेत सायबर सुरक्षा विभागाचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांना ‘सूर्यदत्ता नॅशनल सायबर इंटेलिजन्स अवार्ड’ने सन्मानित करताना डॉ. संजय चोरडिया.

बावधन - सायबर सुरक्षा हा सध्या राष्ट्रीय विषय झाला आहे. सायबर हल्ल्यांविषयी प्रगत राष्ट्रांनाही चिंता वाटत आहे. सीमा आणि शस्त्रांशिवाय असलेला हा लढा गंभीर आहे. इथे शत्रू ओळखण्यास वेळ लागतो. भविष्यात युद्ध झालेच, तर ते सायबर आणि स्पेसच्या माध्यमातून होईल, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी बावधन येथे केले.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षेवरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी ते बोलत होते. या वेळी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, सायबर सुरक्षा विभागाचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सायबर सिक्‍युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरोल्ड डिकोस्टा, सायबर कायदेतज्ज्ञ ॲड. राजेश पिंगळे, सायबरतज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी, संदीप गादिया, सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, संचालक डॉ. शैलेश कासंडे, कॅप्टन शालिनी नायर, व्यवस्थापक सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. 

गोखले पुढे म्हणाले, ‘‘सायबर वॉर’ची अनेक उदाहरणे आपण याआधीही पाहिली आहेत. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनीही निरनिराळे गॅजेट आणि संगणक प्रणालीचा काळजीपूर्वक वापर करायला हवा. त्याचे चांगले-वाईट उपयोग आहेत समजून घ्यावेत. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाच्या उपलब्धी असताना हॅकर्सचेही आव्हान आपल्यासमोर आहे.’ 

शेकटकर म्हणाले, ‘वाढती सायबर गुन्हेगारी आव्हानात्मक बनली आहे. विविध सोशल नेटवर्किंग साइट्‌स, मोबाईल ॲप्समुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण त्याच्या आहारी जात असून, इंटरनेट बंद पडले की आपले सर्व काम थांबते, अशी स्थिती आहे. येत्या काळात मोबाईल फोन मानवापुढील मोठे आव्हान आहे.’ 

या वेळी संभाजी कदम, ॲड. प्रशांत माळी, संदीप गादिया यांना ‘सूर्यदत्ता नॅशनल सायबर इंटेलिजन्स अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com