सैन्याच्या शौर्याची इतिहासगाथा (व्हिडिओ)

दक्षिण मुख्यालय - युद्ध स्मारक संग्रहालयाबाहेर उभी असलेली रणगाड्यांची रांग युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण करून देते.
दक्षिण मुख्यालय - युद्ध स्मारक संग्रहालयाबाहेर उभी असलेली रणगाड्यांची रांग युद्धभूमीवर लढणाऱ्या सैनिकांची आठवण करून देते.

पुणे - घोरपडी रस्त्यावरील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी हुतात्मा सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेत नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर कोरले जातात.

कालचा दिवसही दक्षिण मुख्यालयामधील स्मारकभूमीवर जमलेल्या नागरिकांच्या मनात हुतात्मा वीर जवानांबद्दल अभिमान जागवणारा होता. कर्नल दीपक द्विवेदी यांनी राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिलं. हुतात्मा हवालदार अर्जुन पवार व सैनिक सौरभ खराटे या दोघांच्या वीर पत्नींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं. दर शनिवारी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत ते संग्रहालय नागरिकांसाठी खुलं असतं. तेथे केवळ तरुणच नाही तर छोटी मुलं आणि वयोवृद्धही येतात. छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप यांच्यासारख्या अजरामर शूरवीर नेतृत्वांपासून ते अलीकडच्या काळापर्यंत हुतात्मा झालेल्या जवानांची, अधिकाऱ्यांची नावं भिंतीवर कोरलेली आहेत. साठ फूट उंच, ग्रॅनाइटचं बांधकाम असलेलं राष्ट्रीय स्मारक हा तर प्रेरणेचा प्रचंड स्रोत.

या संग्रहालयात गोवा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतीही जपलेल्या आहेत. चित्रं, छायाचित्रं, पुतळे, अस्त्रंशस्त्रं आदींच्या माध्यमातून युद्ध नजरेसमोर येऊ लागतं. त्यावरील आपल्या सैन्य दलातील हुतात्म्यांनी गाजवलेल्या शौर्याची आपल्याला जाणीव होते आणि देशाभिमान जागृत होतो. दर शनिवारी सायंकाळी सहा वाजता येथे हुतात्म्यांना मानवंदना दिली जाते. बॅंडपथकानं वाजवलेली धून, तिच्यात होणारं परिवर्तन, जवानांच्या तुकडीची परेड, स्मारकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पुष्पचक्र अर्पण केलं जाणं, बंदुकींची सलामी, ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताच्या स्वरलहरी हे सारं पाहताना आपल्या धमन्यांमधलं रक्त सळसळू लागतं. दरवेळी दोन हुतात्मा सैनिकांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्यात येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com