वडकीतील पालखी विसावाजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वडकीतील (ता. हवेली) पालखी विसावाजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला.
Accident
AccidentSakal
Summary

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वडकीतील (ता. हवेली) पालखी विसावाजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला.

उंड्री - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वडकीतील (ता. हवेली) पालखी विसावाजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात झाला. ही घटना आज (मंगळवार, दि. २१ जून, २०२२) दुपारी दोनच्या सुमारास घडली. वडकीचे सरपंच अरुण गायकवाड, सदस्य सागर मोडक, बाळासाहेब साबळे, अमित गुरव, अनिकेत भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर जखमी वारकऱ्यांना मदत करीत प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार करण्यासाठी हलविले.

महादेव दशरथ खोमणे (वय ४२, रा. आंबी बु।।, ता. बारामती, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार ट्रकचालक काकासाहेब साहेबराव ससाणे (वय ४४, रा. हरीजनवस्ती, अरनगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस स्टेशनअंतर्गत उरुळी देवाची पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी हांडेवाडी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे, पोलीस हवालदार विलास कांबळे, पोलीस नाईक अप्पाराव कोळी यांनी घटनास्थळी धाव नागरिक आणि क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com