Wari 2019 : स्वागताची तयारी पूर्ण

आकुर्डी - विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरासमोर उभारलेली स्वागत कमान.
आकुर्डी - विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरासमोर उभारलेली स्वागत कमान.

पिंपरी - जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २५) शहरात आगमन होणार आहे. महापालिकेने स्वागताची जय्यत तयारी केली असून, रस्त्याची डागडुजी, साफसफाई, विद्युत, पाणीपुरवठा आदी कामे मार्गी लावली आहेत.

शहराच्या प्रवेशद्वारावर निगडीतील भक्‍ती-शक्‍ती येथे महापालिकेकडून महापौर राहुल जाधव आणि आयुक्‍त श्रावण हर्डीकर पालखीचे स्वागत करणार आहेत. त्यासाठी मंडप उभारला असून, ध्वनिक्षेपकाचीही व्यवस्था केली आहे. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी विद्युत विभागाने भक्‍ती-शक्‍ती आणि पालखी मुक्‍कामाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावले आहेत. स्थापत्य विभागाच्या वतीने पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण केले आहे. रस्त्यावर पांढरे पट्टे मारले असून, रस्त्याच्या कडेचा राडारोडाही उचलला आहे. आरोग्य विभागाने रस्त्याच्या साफसफाईकडे विशेष लक्ष दिले असून, आवश्‍यक ठिकाणी कीटकनाशक औषधांची फवारणी केली आहे.

सध्या शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होतो. पालखीचे आगमन लक्षात घेऊन महापालिकेने प्राधिकरण, निगडी, आकुर्डी परिसरात २४ ते २६ जून दरम्यान दोनवेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वारकऱ्यांच्या निवासाची सोय परिसरातील शाळांमध्ये केली आहे. तसेच ५०० पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. मंदिराजवळ प्रवेशद्वार उभारले असून, प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई केली आहे.

महापौरांकडून पाहणी
पालखी मार्गाची तसेच मुक्‍कामाच्या ठिकाणाची पाहणी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (ता. २४) केली. या वेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना साफसफाई तसेच इतर सूचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com