पारंपरिक वेशात महिलांची वारज्यात बुलेट रॅली

bullet-rally
bullet-rally

वारजे माळवाडी - नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोईवर पदर, पदरावर तुरा काढुन बांधलेला फेटा, डोळ्यावर गॉगल, लावून, गळ्यात सोन्याच्या दागिन्यांचे विविध साज केलेल्या महिला पदर खोचून अभिनेत्री प्राजक्ता माळी समवेत बुलेटवर स्वार झाल्या होत्या. महिलांच्या बुलेट रॅलीने वारजे माळवाडी परिसरातील रस्त्यावर महिलराज अवतरले होते. सुमार आठशे महिलांनी या रॅलीमध्ये महभाग घेतला होता. निमित्त होते, जागतिक महिला दिनाचे... त्या निमित्त नगरसेवक सचिन दोडके मित्र परिवाराच्या वतीने वारजे माळवाडीत  बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 
जय जिजाऊ, भारतमाता अश्या घोषणा देत, दहा वाजता रॅलीला सुरुवात झाली. 

नऊवारी साडी बरोबर, राम लक्ष्मण सीता, राम हनुमान पांडुरंग, भारतमाता, विविध मातांचा यम, घोड्यावर आलेली पाठीशी पोर बांधून आलेली झाशीची राणी, शेतकरी, नौदलातील अधिकारी, दोन पांढऱ्या ड्रेस मधील पऱ्या, नऊवारी साडी व डोईवर पुणेरी पगडी, तिरंग्याच्या वेशात सैनिक आशा वेशात महिला सहभागी झाल्या होत्या. काही जणींनी गाडीला उंच भगवा झेंडा लावला होता. तर काही जणी पांढरा कुर्ता व निळी जीन्स घालून, डोळ्यावर गॉगल टाकून सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमाला सचिन दोडके यांच्यासह शुक्राचार्य वांजळे, नगरसेविका सायली वांजळे, नगरसेविका दीपाली धुमाळ, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे उपस्थित होत्या. 
पहिला क्रमांक आदित्य गार्डन सिटीच्या नवशक्ती महिला मंडळाने पटकाविला. नऊ दुर्गा त्यांच्या आयुधांसह होत्या. त्या जोडीला भारतमाता व या नऊ दुर्गांची पूजा करणारी एक अशा अकरा जणी सहभागी झाल्या होत्या. याची संकल्पना अनुलता हसनकर यांची होती. यांच्यासह।सुजाता सालगरे, ज्योती भोरे, देवयानी जहांगीरदार, भक्ती गोडबोले, लक्ष्मी दुबे, मोहिता हांडा, नीलिमा देशमुख, नीतू शिंगोरणीकर, राजश्री सिंग, प्रियांका  यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 

36 ते 65 वयोगटात विद्या लभाडे, 26 ते 35 वयोगट भाग्यश्री ढोरे, 16 ते 25 वयोगटात रेखा नारणे, 5 ते 15 वयोगट मध्ये आर्या मोरे यांनी बक्षिसे मिळवली. तर उत्तेजनार्थ झाशीची राणी झालेली अनिता चव्हाण, शेतकरी महिला मेघना झुझम, करतेपट्टू स्नेहल बडसकर, नौदलातील अधिकारी शबाना शेख, परी झालेल्या रत्नावली सुवर्णकार, अश्विनी पंडित, नऊवारी व पुणेरी पगडी शांभवी ओझा, ओवी ढोरे, अक्षता कोळेकर यांना ही बक्षिसे दिली. तर दुचाकी 15 हजार किलोमीटर दुचाकी चालविणाऱ्या अनघा संत यांचा विशेष सत्कार केला. 

कार्यक्रमाचे आयोजन रेखा सोनुने, आरती हेंद्रे, अनुलता हसनकर, निलोफर शेख, रेश्मा भांडरी, मानसी कोळेकर यांनी आयोजन केले होते. 

यावेळी, विजेत्यांना दोडके परिवारातील सोनाली, ऋतुजा, स्नेहा, आशा, ज्योती, राणी, शिल्पा, प्रियांका, रतन, रेश्मा बराटे, सोनाली बालवडकर, शुभांगी जांभळे, प्रणाली फडके, पूजा हगवणे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शांता नेवसे, नयना डोळसकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 

स्वतः ला कमी लेखू नका 
प्राजक्ता माळीसह रॅलीत महिलांचा मोठा उत्साह होता. तुम्ही खूप मस्त नटून आल्या आहेत. बुलेट सारखी गिअरची गाडी चांगल्या चालविता. आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे. स्वतःला कमी लेखू नका. मी तुमची कार्यशाळा घेण्यासाठी येणार असे मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सांगितले.

बुलेट चालविणे शिकण्यापासून तयारी सुरू
रोजची सर्व कामातून वेळ बाजूला काढून महिला मोठ्या आत्मविश्वास, स्वाभिमान, अभिमानाने त्या सहभागी झाल्या होत्या. बुलेट रॅलीचे हे आमचे हे तिसरे वर्ष आहे. महिलानांचा उत्साह मोठा असल्याने उत्तम प्रतिसाद मिळाला. बुलेट चालविणे शिकण्यापासून तयारी सुरू होती. रॅलीसाठी महिलांनी सहभागी विविध तयारी केली होती. सचिन दोडके, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com