शिरूरमधील संघटना आक्रमक; शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी आंदोलन करण्याचा दिला इशारा 

भरत पचंगे
Friday, 25 September 2020

सरदवाडी (ता. शिरूर) येथील अभिनव विद्यालयातील शिक्षक भरत नामदेव सरोदे यांचा कोरोना सर्व्हेक्षण करताना हृदयविकाराने मृत्यू झाला. याबाबत सर्व शिक्षक संघटना आक्रमक आहेत.

शिक्रापूर (पुणे) : माध्यमिक शाळा शिक्षक भरत सरोदे यांना कोविड सर्व्हेक्षणाची नियमबाह्य ड्यूटी दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सरोदे कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत तत्काळ मिळावी, या मागणीसाठी 14 ऑक्‍टोबरला शिरूरमध्ये धडक मोर्चा काढण्याचा निर्णय क्रांतिवीर प्रतिष्ठानने घेतल्याची माहिती भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे व भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरदवाडी (ता. शिरूर) येथील अभिनव विद्यालयातील शिक्षक भरत नामदेव सरोदे यांचा कोरोना सर्व्हेक्षण करताना हृदयविकाराने मृत्यू झाला. याबाबत सर्व शिक्षक संघटना आक्रमक आहेत. सरोदे कुटुंबाला शासनाकडून तातडीची मदत दिली गेलेली नाही. सरोदे यांची तीन वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती, त्यांचे वय 51 होते. 50 वर्षे वयावरील, तसेच गंभीर आजार असणाऱ्या शिक्षकांना सर्व्हेक्षण ड्यूटी देऊ नये, असा सरकारी आदेश आहे. त्यामुळे सरोदे यांच्या मृत्यूची जबाबदारी निश्‍चित करून संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा, या मागणीचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 13 ऑक्‍टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 14 ऑक्‍टोबरला शिरुर तहसील कचेरी तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे पाचंगे व शिंदे यांनी सांगितले. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

मी ड्यूटी लावली नाही : गटशिक्षणाधिकारी 
गटशिक्षणाधिकारी राजेंद्र लोंढे म्हणाले, ""कोरोना सर्व्हेक्षण ड्यूटीसाठी माझ्याकडे तहसीलदार वा शिरुरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यादी मागितली नाही. सरोदे यांना ड्यूटी तहसीलदार व शिरुर सीईओंच्या स्तरावर लागली आहे. सरोदे यांनी प्रकृतीची तक्रार केली नव्हती. एकाही शिक्षक संघटनेने त्यांच्या आजाराबद्दल मला सांगितले नाही. तरीही सरोदेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning to agitate over teacher's death