esakal | लोणावळ्यात २१० मिलिमीटर पावसाची नोंद; धोक्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

210 mm rainfall at Lonavala

लोणावळ्यात २१० मिलिमीटर पावसाची नोंद; धोक्याचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा झोडपले असून बुधवारी (ता.०४) सकाळी आठ वाजेपर्यंत २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने ऐन सणासुदीच्या मुहूर्तावर नागरिकांच्या उत्साहावर विरजण आले आहे. लोणावळा परिसरात हंगामात आतापर्यंत एकूण ५ हजार ५९७  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा नगरपालिकेचे तुंगार्ली, टाटांची वलवन, लोणावळा तलाव,भुशी ही धरणे जुलैच्या पहिल्या सप्ताहातच भरली. मात्र गेले दोन दिवस पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टाटाच्या वतीने धोक्याचा इशारा
पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास लोणावळा धरणाचा सांडवा द्वारविरहित असल्याने कोणत्याही क्षणी लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सूरू होण्याची शक्यता आहे. तर वलवन धरण यापूर्वीच १०० टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून १०० ते २०० क्युसेकने नियंत्रित विसर्ग सोडण्यात येणार आहे.

धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे, पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत,वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

loading image
go to top