सावधान : विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

शहरातील सर्वाधिक तापमान लोहगाव येथे 39.1अंश सेल्सिअस नोंदविले गेले.पुढील दोन दिवस तरी शहरातील तापमान सरासरीपेक्षा जास्तच असेल.आकाश ढगाळ असण्याची शक्याता,हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

पुणे : शहर आणि परिसरातील चाळिशीच्या पुढे गेलेला पारा मंगळवारी किंचितसा कमी झालेला पचायला मिळाला. मागील तीन दिवसांच्या तुलनेत शहरातील सरासरी कमाल तापमानात दोन अंशांनी घट होत तापमान 37. 6 अंश सेल्सिअसवर पोचले. मात्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान सरासरी पेक्षा जास्त होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील सर्वाधिक तापमान लोहगाव येथे 39.1 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील दोन दिवस तरी शहरातील तापमान सरासरीपेक्षा जास्तच असेल. परंतु, दुपारनंतर अंशतः आकाश ढगाळ असण्याची शक्याता, हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 25.2 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. राज्यभरातही मंगळवारी उन्हाचे चटके जाणवत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट आल्याचे हवामान विभागाने पत्रकात म्हटले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट असेल, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकण वगळता उर्वरीत राज्यातील हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र असणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warning of heat wave in Vidarbha, Marathwada