राहुल कुल यांच्यासह तिघांना वॉरंट

राहुल कुल यांच्यासह तिघांना वॉरंट

दौंड - स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडीपोटी दिलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह तिघांना दौंड न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. 

आमदार कुल हे पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याने दौंडमधील स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून २०१५- २०१६ च्या गळीत हंगामासाठी कर्ज घेतले होते. ऊसतोडणी व वाहतुकीच्या ४०० कंत्राटदारांना प्रत्येकी ५ लाख प्रमाणे २० कोटीचे कर्ज संचालकांची विनंती आणि दिलेल्या हमीवरून मंजूर करून वितरित केले होते. कर्जाची व्याजासह परतफेड केली नव्हती. दरम्यान, ९ मे २०१८ रोजी कर्जापोटी कारखान्याने ५ कोटीचा धनादेश बॅंकेला दिला, परंतु कारखान्याच्या बॅंक खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने तो वटला नाही. बॅंकेच्या वतीने स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी दौंड न्यायालयात दाद मागितली. या खटल्यात समन्स बजावूनही कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल, कार्यकारी संचालक अशोक राजाराम पाटील व संचालिका श्रीमती नंदा पोपट गुणवरे हजर न राहिल्याने जामिनपात्र वॉरंट बजावले आहे. 

स्टेट बॅंकेने कारखान्याबरोबर केलेल्या करारातील अटींचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने हा खटला दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली जाईल.
 - राहुल कुल, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com