युद्धनौकेवरून 300 किमीपर्यंत मारा शक्‍य 

warship can kill up to 300 km
warship can kill up to 300 km

पुणे - युद्धनौकेवरून एकावेळी आठ ब्राह्मोस क्षेपणास्त्रे अवकाशात झेपावू शकतील, अशी रचना असलेले क्वॉड लॉन्चर विकसित करण्यात लार्सन ॲण्ड टुब्रोला (संरक्षण विभाग) यश आले आहे. युद्धनौकेवरून तीनशे किलोमीटरपर्यंत वेध घेण्याची या क्वॉड लॉन्चरची क्षमता असल्याने युद्धनौका तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने भारतीय नौदल पुढचे पाऊल टाकेल, असा विश्‍वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. 

लार्सन ॲण्ड टुब्रोच्या (एल ॲण्ड टी) तळेगाव येथील स्ट्रॅटेजिक सिस्टिम कॉम्प्लेक्‍स येथे शनिवारी क्वॉड लॉन्चर ब्राह्मोस एरोस्पेस प्रा. लि. कडे हस्तांतर करण्यात आले. एल ॲण्ड टी बोर्डचे सदस्य आणि संचालक (संरक्षण) जयंत पाटील व ‘ब्राह्मोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर मिश्रा उपस्थित होते. ब्राह्मोसच्या (सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल) क्षेपणास्त्रांकरता क्वाडरपल कॅनिस्टराइज्ड इनक्‍लाइन्ड लॉन्चरची काटेकोर चाचणी तळेगाव येथे घेण्यात आली. युद्धनौकेवर एकावेळी दोन (मागे व पुढे) लॉन्चर बसविता येतील. प्रत्येक लॉन्चरमध्ये चार क्षेपणास्त्रे ठेवता येतील, अशी रचना करण्यात आली आहे. याकरिता रशियाचे सहकार्य लाभले आहे. रशियन अभियंत्यांच्या उपस्थितीत लॉन्चरची चाचणी  घेण्यात आली. 

एल ॲण्ड टीची ब्राह्मोससोबत दोन दशकांची भागीदारी आहे. रशियन फेडरेशनच्या सहकार्याने अठरा महिन्यांत लॉन्चर विकसित केला आहे. लॉन्चरची काटेकोर चाचणी झाली आहे. बाजारातून तुम्हाला जे अपेक्षित असते त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करावे लागते.  
- जयंत पाटील, सदस्य, एल ॲण्ड टी बोर्ड 

तंत्रज्ञान विकासाकरिता मेक इन इंडियाअंतर्गत ब्राह्मोसने विशेष पुढाकार घेतला आहे. प्रामुख्याने भारतीय बनावटीच्या तंत्रज्ञानावर ब्राह्मोसने लक्ष्य केंद्रित केले आहे. ८५ टक्के भारतीय बनावटीवर केंद्र सरकारचा भर आहे. त्यानुसार आम्ही प्रयत्नशील आहोत. भविष्याचा वेध घेऊन जे आवश्‍यक आहे त्यातच गुंतवणूक करणे योग्य ठरते. विद्यमान केंद्र सरकारचा ‘मेक इन इंडिया’वरच अधिक भर आहे.
- डॉ. सुधीर मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, ब्राह्मोस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com