करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी, महापालिकेच्या दोन विभागात समन्वय नाही

राजेंद्रकृष्ण कापसे
शुक्रवार, 23 मार्च 2018

वारजे माळवाडी (पुणे) : पुणे महापालिकेने चांदणी चौक परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी रहिवाश्यांना नोटिस दिल्या आहेत. त्याच रस्त्यावर पालिकेने आता काँक्रीटचे बॉक्स करून त्यामध्ये पथ दिवे बसविण्याचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या दोन खात्यांमध्येच समन्वय नसल्याने नागरिकांचा पैस वाया जात असल्याची बाब येथील जाणकार नागरिकांनी उघडकीस आणली आहे. 

वारजे माळवाडी (पुणे) : पुणे महापालिकेने चांदणी चौक परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी रहिवाश्यांना नोटिस दिल्या आहेत. त्याच रस्त्यावर पालिकेने आता काँक्रीटचे बॉक्स करून त्यामध्ये पथ दिवे बसविण्याचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या दोन खात्यांमध्येच समन्वय नसल्याने नागरिकांचा पैस वाया जात असल्याची बाब येथील जाणकार नागरिकांनी उघडकीस आणली आहे. 

चांदणी चौकातील पुलाचे काम करताना या चांदणी चौकातून भुगाव, पौडकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी, महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी यांच्या सहीने ही पत्रे 28 फेब्रुवारीला दिली आहेत. त्यामध्ये तुमची जागा विकास आराखड्यातील रस्त्यासाठी तुमची जागा तडजोडीने पालिकेला ताबा द्यावा. त्याचा बदल्यात एफएसआय किंवा टीडीआर द्यावा असे म्हटले आहे. एवढी मोठी प्रक्रिया सुरू असताना किंवा चांदणी चौकात प्रस्तावित उड्डाणपूलाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी पालिकेचा दुसऱ्या विभागाचे काही दिवसात/महिन्यात रुंदीकरण होणार आहे, तरी देखील या ठिकाणी पथ दिवे बसविण्याचे काम सुरू आहे. काही दिवस महिन्यासाठी हा खर्च का केला जात आहे. मार्च अखेर जवळ आल्याने निधी खर्च करण्याचे "टारगेट" तर पूर्ण केले जात नाही ना, असा सवाल या परिसरातील नागरिकांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. 

या परिसरातील नागरिक तितीक्षा नगरकर म्हणाल्या, "आम्हाला महापालिकेने रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची  कार्यवाही सुरू होते. त्याबाबतचे पत्र आम्हाला दिले आहे. मग ज्या रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू केले आहे. त्या ठिकाणी एक टेम्पोमधून काँक्रीटचे साहित्य, चौकोनी बॉक्स करण्याचे साहित्य, खांब उभे करण्यासाठीचे लोखंडी रॉड (नट) आणून ते काम सुरू आहे. पथ दिवे का बसविले जात आहेत. मग ही करदात्यांच्या पैशाची उधळण का केली जात आहेत. त्यांनी याबाबत, तातडीने प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप वेडे-पाटील व कोथरुड क्षेत्रिय कार्यालयातील सहायक आयुक्तना फोन करून ही निदर्शनास आणून दिली. 

गुरुवारी नगरकर यांनी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत, आज शुक्रवारी या ठिकाणी पालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व पालकेच्या क्षेत्रीय कार्यलयाचे विद्युत विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील. पथ दिव्याचे खांब रुंदीकरणाच्या हद्दी बाहेर उभे केले जातील. जनतेचा पैसे वाया जाणार नाही याची दक्षता घेऊ, असे कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत भोसेकर यांनी सांगितले. 

Web Title: wastage of money of income tax payers, incoordination between 2 departments