पुणे - जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाबाहेर कचऱ्याचे ढीग

रमेश मोरे
शुक्रवार, 30 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानाच्या सिमा भिंतीलगतचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी व अस्वच्छतेमुळे सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे.

उद्यानाच्या सिमा भिंतीजवळ नागरीकांनी टाकलेला कचरा, वाळलेल्या झाडांच्या फांद्या यामुळे अस्वच्छता पसरली आहे. सकाळी व रात्री उद्यानात येणारे नागरीक डासांच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. या उद्यानात योग ध्यान धारणा केंद्र असल्याने अबाल वृद्धांची गर्दी येथे मोठ्या प्रमाणात असते. डासांच्या चावण्यामुळे ध्यान धारणा व योग व्यायाम करायचा की डासांपासुन स्वत:चे संरक्षण करायचे असे व्यायामासाठी आलेले नागरिक सांगतात. नुकतीच येथे बालचमुंसाठी खेळणी बसविण्यात आल्याने बालचमुंची गर्दीही या उद्यानात मोठी असते.

उद्यान परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात नियमित  औषध फवारणी व उपाय योजना कराव्यात.कचरा टाकणा-यांवर प्रशासनाकडुन कारवाई व्हावी अशी नागरीकांमधुन मागणी होत आहे.फोटो ओळ- जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाच्या सिमाभिंती लगत वाढलेला कचरा.

Web Title: waste in front of shivsrushti garden in sangavi pune