टाकाऊ वस्तूंपासून ‘आर्टिस्टिक कॉर्नर’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुणे - संभाजी उद्यानामध्ये विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक असा ‘आर्टिस्टिक कॉर्नर’ साकारला आहे. अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन आणि महापालिकेच्या सहकार्यातून ही निर्मिती केली आहे. या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून उद्यानाच्या कोपऱ्यात कलात्मक अशा विविध गोष्टींची निर्मिती केली आहे. 

‘अर्बन-९५’ अभियान या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी या कलात्मक गोष्टी साकारल्या आहेत. यामध्ये रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्यांचा उपयोग करून झाडांना संरक्षणाचा पार तयार करण्यात आला आहे, वाहनांच्या जुन्या टायरपासून लांब सापाचे कुंपण, मुलांना खेळण्यासाठी टायरची ‘जंगल जीम’ अशा विविध गोष्टी तयार करण्यात आल्या आहेत. तसेच शिवकालापासून मेट्रोपर्यंत पुण्याची प्रगती दाखविणारी ग्राफिटी वॉल रंगविली आहे. 

पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना खेळण्यासाठी वापर करता येतील अशा गोष्टी साकारल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्राचार्य लीना देबनाथ, प्रा. अमीर पटेल यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Waste Goods Artistic Corner